संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी – शिर्डी नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१२) प्रभाग आरक्षण सोडत झाली.
आज शुक्रवार रोजी सकाळी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये प्रांतधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी विद्यमान नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर,उपनगराध्यक्ष सचिन उर्फ हरिचंद्र कोते, नगरसेवक आणि शिर्डी नगरपंचायत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 17 चे आरक्षण पुढील प्रमाणे सोडत पद्धतीने काढण्यात आलेआहे.
त्यामध्ये प्रभाग क्रमांक ( 1 ) सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक ( २ ) सर्वसाधारण महिला तर प्रभाग क्रमांक ( 3 ) मध्ये सर्वसाधारण व प्रभाग ( 4 ) मध्ये सर्वसाधारण त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ( 5 ) मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व ( 6 ) व ( 7 ) प्रभागात अनुसूचित जातीची महिला असे आरक्षण निघाले असून प्रभाग क्रमांक ( 8 ) मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच प्रभाग क्रमांक ( 9 ) मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण राहणार असून प्रभाग क्रमांक ( 10 ) मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व प्रभाग ( 11 ) मध्ये अनुसूचित जाती तसेच प्रभाग ( 12 ) मध्ये अनुसूचित जमाती व प्रभाग ( 13 ) मध्ये सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले असून प्रभाग क्रमांक ( 14 ) मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राहणार आहे तर प्रभाग ( 15 ) आणि ( 16 ) मध्ये सर्वसाधारण महिला तसेच प्रभाग क्रमांक ( 17 ) सर्वसाधारण असे आरक्षण शिर्डी नगरपंचायतच्या आगामी निवडणुकासाठी सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले आहे.
हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि सर्वांच्या सहकार्याने पार पाडण्यात आला आहे.
संकलन – राजेंद्र गडकरी