शिर्डी काकडी विमानतळ परिसरात दुहेरी हत्याकांडातील दोघे आरोपींना अटक, १२ तासाच्या आत गुन्ह्याची उकल ; अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच विशेष कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी: शिर्डी येथील काकडी विमानतळ परिसरात दुहेरी हत्याकांड घडले होते, या हत्याकांडातील दोघा आरोपींना पोलिसांनी अटक करुन १२ तासाच्या आत गुन्ह्याची उकल करण्यात अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचला यश आले आहे. संदीप रामदास दहाबाड (वय १८), जगन काशिनाथ किरकिरे (वय २५, दोघे रा.तेलीम्बरपाडा, ता.मोखाडा, जि.पालघर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, , श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, , शिर्डी डिवाय एसपी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार तपासी टीममधील सपोनि हेमंत थोरात, पोसई तुषार धाकराव, अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, जालींदर माने, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, अरूण मोरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे. तपास पथकास संशयीत आरोपींचा शोध घेणेकामी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोनि संभाजी गायकवाड व सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी मदत केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.४ एप्रिल २०२५ रोजी रात्री साहेबराव पोपट भोसले (रा.दिघेवस्ती, पिंप्री रोड, काकडी ता.राहाता) यांच्या राहत्या घरी अज्ञात आरोपींनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हत्यारांनी कृष्णा साहेबराव भोसले (वय ३०), साहेबराव पोपट भोसले (वय ६०) यांना जीवे ठार मारून तसेच साकरबाई साहेबराव भोसले (वय ५५, सर्व रा.दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता.राहाता) यांना गंभीर जखमी करून दुचाकी व मोबाईल चोरून नेला, याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुरनं १७१/२०२५ बीएनएस २०२३ कलम १०३(१),१०९(१),३११,३३१(८) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
काकडी (ता.राहाता) येथे घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हयांची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ एसपी राकेश ओला, श्रीरामपूर. अपर पोलीस अधीक्षक.वैभव कलुबर्मे, शिर्डी डिवायएसपी शिरीष वमने, यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन, गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना देऊन समांतर तपास करणेबाबत आदेश दिले होते. आदेशा प्रमाणे क्राईम ब्रॅंच पोनि दिनेश आहेर यांनी तपासासाठी तीन टीम तयार करून, गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सूचना व मार्गदर्शन केले.
दि.५ एप्रिल २०२५ रोजी तपास पथके तांत्रीक विश्लेषण व बातमीदाराच्या आधारे तपास करत असताना गुन्हा करणारे दोन संशयीत हे टेम्पोमधुन सिन्नर मार्गे नाशिककडे जात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. तपासी टीमला मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका (सिन्नर, जि.नाशिक) येथे सापळा रचून संशयीतांचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजुस बसलेले संशयीत दोन मिळून आल्याने संदीप रामदास दहाबाड, जगन काशिनाथ किरकिरे ( दोघे रा.तेलीम्बरपाडा, ता.मोखाडा, जि.पालघर) अशांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता संदीप रामदास दहावाड याने त्याचे साथीदारासह रात्री १२.३० वजण्याच्या सुमारास काकडी विमानतळ परिसरामधील एका घरामध्ये जाऊन दोन – तीन जणांना लाकडी दांडक्याने व फावड्याने मारहाण केली व चोरी केल्यानंतर पळून जात असल्याबाबत माहिती दिली. ताब्यात घेण्यात आरोपी संदीप रामदास दहाबाड, जगन काशिनाथ किरकिरे (दोघे रा.तेलीम्बरपाडा, ता.मोखाडा, जि.पालघर) यांना गुन्ह्याचे तपासकामी राहाता पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पुढील तपास राहाता पोलीस ठाणे हे करीत आहे.