शिर्डीत १६ अवैध व्यावसायिकांवर अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने कारवाई

शिर्डीत १६ अवैध व्यावसायिकांवर अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी : येथील १६ अवैध व्यावसायिकांवर अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने कारवाई केली. या कारवाईत २ लाख २ हजार ३६० रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एसपी राकेश ओला यांनी आहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्या आदेशाप्रमाणे पोनि दिनेश आहेर यांनी आहिल्यानगर क्राईम ब्रॅंच व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विशाल तनपुरे, रणजीत जाधव, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ अशांचे पथक तयार करून शिर्डी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले.
दि.६ में २०२५ रोजी पथकाने शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध दारू विक्रेते व अवैध जुगार चालविणाऱ्या इसमांची माहिती काढुन, पंचासमक्ष १६ वेगवेगळया ठिकाणी छापे टाकुन अवैध व्यावसायिकांविरूध्द कारवाई केली.त्यामध्ये शिर्डी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगारबंदी कायदयान्वये ७ व महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये ९ असे एकुण १६ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात २ लाख २ हजार ३६०- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे दाखल संख्या कारवाई प्रकार जप्त मुद्देमाल
शिर्डी 7 जुगार केसेस 1,09,830/-, , शिर्डी 9 दारूबंदी केसेस 92,530/-
कारवाई एसपी राकेश ओला,, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शिर्डी डिवायएसपी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!