संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी: सालाबादप्रमाणे यावर्षीही शिर्डी येथे ‘हनुमान जन्मोत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. क्रांती युवक मंडळ व शिर्डी ग्राम आयोजित हनुमान जन्मोत्सव उत्सव समितीच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा सकाळी हनुमान जन्मोत्सव, मंगलस्नान व आरती झाली. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सालाबाद प्रमाणे १२५ किलो वजनाचा “बजरंग गोटा” उचलण्याची अनोखी स्पर्धा झाली. ” बजरंग गोट्याची विधीवत पूजा शिर्डी ग्रामस्थ सुधाकर शिर्डी, मा. विश्वस्त सचिन तांबे, रमेशभाऊ गोंदकर, दिपक वारुळे, नाना त्रिभुवन, पप्पू गायके, अमोल गायके, तान्हाजी गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. स्पर्धेत शिर्डीतील युवकांनी व साईभक्तांतांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.
बजरंग गोटा’ उचलणारे डॉ. प्रशांत गोंदकर, राजेंद्र पांचाल, सुरेश सुपेकर, नाना त्रिभुवन, समाधान बनकर, सुदर्शन वेर्णेकर, सचिन शेव तसेच सुरक्षासाठी तैनात असलेल्या पोलिस बांधवांनी देखील बजरंग गोटा उचलत शक्तीची उपासना केली. सर्व विजेत्याचा सत्कार निलेश कोते, सुरेंद्र महाले, विशाल कोळपकर, आकाश त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सायंकाळी महाआरती व तरुणांच्या निव्यसनतेची प्रतीक असलेल्या चांदीच्या गदेचे पूजन करून झाला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद प्रेमानी, राहुल गोंदकर, शिवम अग्रवाल, बबलू वर्पे, राहुल हजारे आदिंसह युवकांनी परिश्रम घेतले.