शिर्डीत गर्दीचा फायदा घेऊन चैनस्नॅचिंग करणार्‍यांसह सोनार पोलिसांच्या ताब्यात ; 4 गुन्ह्यांचा तपास ः ‘क्राईम ब्रॅँच’ची कामगिरी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी ः रामनवमी उत्सव काळात शिर्डीमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चैनस्नॅचिंग करणार्‍या टोळीतील दोघांसह सोनारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 3 लाख 20 हजार रू किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, शिर्डी येथे घडलेेले 4 गुन्हे उघडकीस आणण्यात अहिल्यानगर क्राईम ब्रॅँचला यश आले आहे. अविनाश अशोक कुसळकर (वय 20, रा.तलावडा रोड, गांधीनगर, ता.जि.बीड), आदित्य दीपक बोरकर (वय 22, रा.तनपुरेगल्ली, राहुरी, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर) व सोनार गौरव सुनिल जोजारे (वय 23, रा.चंपावतीनगर, ता.जि.बीड) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एसपी राकेश ओला, शिर्डी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शिर्डी डिवायएसपी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅँच पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोसई तुषार धाकराव व पोलीस अंमलदार विश्वास बेरड, बिरप्पा करमल, फुरकान शेख, अरूण गांगुर्डे, सोमनाथ झांबरे, जालींदर माने, रोहित येमुल, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, आकाश काळे आदींच्या टीमने ही कारवाई केली.


याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.6 एप्रिल 2025 रोजी 5 वाजण्याच्या सुमारास श्री.साईबाबा पालखी मिरवणुकीमध्ये शिर्डी येथे असताना अज्ञात आरोपींनी गळयातील सोन्याची चैन बळजबरीने ओढून चोरून नेली, या रामप्रसाद पुटुराव (रा.सेक्टर 54,रा.बेंगलोर, कनार्टक) यांच्या फिर्यादीवरुन शिर्डी पोलीस ठाण्यात गुरनं.356/2025 बीएनएस कलम 309(4) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर क्राईम बॅ्रंचला जिल्ह्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते. त्यानुषंगाने क्राईम बॅँच टीमने दि.8 एप्रिल 2025 रोजी शिर्डी पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्ह्याचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना गुन्हा हा अविनाश कुसळकर (रा.गांधीनगर, बीड) याने त्याच्या साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले.निष्पन्न आरोपीचा शोध घेत असता आरोपी हा खरवंडीकासार (ता.पाथर्डी) येथे असल्याची माहिती मिळाली. क्राईम बॅ्रंच टीमने खरवंडी कासार ( ता.पाथर्डी) येथे निष्पन्न आरोपी शोध घेऊन अविनाश अशोक कुसळकर (वय 20, रा.तलावडा रोड, गांधीनगर, ता.जि.बीड) हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने आदित्य बोरकर (रा.राहुरी, जि.अहिल्यानगर) याचेसह रामनवमी दरम्यान शिर्डी परिसरातून गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागीने चोरी केल्याची माहिती दिली.ताब्यातील आरोपीकडे गुन्ह्यांतील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिणे आपसात वाटून घेतले.अविनाश अशोक कुसळकर याच्या वाटयास आलेले सोन्याचे दागिणे हे बीड येथील सोनार गौरव जोजारे यास विकल्याची माहिती दिली. त्यानुसार सोनार गौरव सुनिल जोजारे (वय 23, रा.चंपावतीनगर, ता.जि.बीड) यांना नोटीस बजावण्यात येऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्याने विकत घेतलेले सोने हे चोरीचे असल्याचे माहिती दिली. क्राईम ब्रँच टीमने ताब्यातील आरोपीने त्याच्या साथीदाराबाबत दिलेल्या माहितीवरून शोध घेऊन आदित्य दिपक बोरकर ( वय 22, रा.तनपुरेगल्ली, राहुरी, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर) हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी पंचासमक्ष ताब्यातील आरोपी आदित्य दिपक बोरकर यांची अंगझडती घेऊन त्याच्या ताब्यातून 3 लाख 20 हजार रु किंमतीचे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याची दागिणे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
क्राईम बॅँच टीमने पंचासमक्ष ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबाबत विचारपूस केली, त्यांनी रामनवमी दरम्यान शिर्डी येथे केलेल्या गुन्ह्यांच्या माहितीवरून, शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयांची पडताळणी करून आरोपीकडून शिर्डी पोलीस ठाण्यातील 2 जबरी चोरी व 2 चोरी असे एकूण 4 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेे आहेत. ताब्यातील आरोपी अविनाश अशोक कुसळकर, आदित्य दिपक बोरकर, गौरव सुनिल जोजारे (वय 23, रा.चंपावतीनगर, ता.जि.बीड) अशांना गुन्हयाचे तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले. गुन्हयाचा पुढील तपास शिर्डी पोलीस हे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!