शिर्डीतून हद्दपार सराईत गुन्हेगार जेरबंद ; ३ अवैध दारू बाळगणाऱ्यांवर अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी : राहाता तालुक्यातील शिर्डी (सावळीविहीर) येथून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात आला. तर तीन ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांवर छापे टाकून अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने कारवाई केली आहे. राहुल उर्फ दिपक वाघमारे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, शिर्डी डिवायएसपी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोसई अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार संतोष लोढे, बाळासाहेब नागरगोजे, प्रमोद जाधव, रमीजराजा आत्तार, अमृत आढाव व महादेव भांड आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीम दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमधील फरार, पाहिजे आरोपी व अवैध धंद्यांची माहिती घेत असताना हद्दपार राहुल उर्फ दिपक विलास वाघमारे (रा.सावळीविहीर, ता.राहाता) हा हद्दपार असताना तो त्याच्या राहत्या घरी असल्याची अशी खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून क्राईम ब्रॅंच टीमने सावळीविहीर (ता.राहाता) येथे जाऊन हद्दपार आरोपी राहुल उर्फ दिपक वाघमारे याच्या राहत्या घरी शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीचे हद्दपार आदेशाबाबत खात्री केली असता, आरोपी दिपक विलास वाघमारे (वय ३४, रा.सावळीविहीर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर) यास उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी विभाग, शिर्डी यांच्याकडील प्रस्ताव एसआर क्र.०६/२०२४ दि.१५ फेब्रुवारी २०२४ आदेशान्वये अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुध्द शिर्डी पोलिस ठाण्यात गु.र.नं. १४६/२०२५ मपोकाक १४२ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध दारू बाळगणाऱ्यांची माहिती काढुन, पंचासमक्ष ३ वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. शिर्डी पोलिस ठाण्यात गुरनं १४३/२५ महा.दारुबंदी कायम कलम ६५(ई) नुसार १ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त, १४४/२५ महा.दारुबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार १० हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त, १४५/२५ महा.दारुबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली.