संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : प्रत्येक गावाच्या विकासात गावपातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असते. ते त्यांनी दिल्यास भारत देश महासत्ता बनण्यास कोणीही अडवू शकत नाही, असे प्रतिपादन अमरावती पोलिस अधिक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी केले आहे.
पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात गावपातळीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पोलिस अधीक्षक डाॅ.राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री राठोड बोलत होते.

श्री डाॅ.राठोड पुढे म्हणाले, आपल्या गावात प्राथमिक शिक्षण घेऊन तो कोणीही असो, तो कुठेही अधिकारी अथवा एखादा कर्मचारी म्हणून कार्यरत असला, तरी त्यांची नाळ ही आपल्या जन्मभूमीशी जोडलेली असते. गावातील युवकांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, असे म्हणत, त्यांनी गावासाठी अधिक चांगले काम करण्यासाठी विशेषतः युवकांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिरापूर येथील अनेक मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.