संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री तथा न्याय मंत्री होते. त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकजण सुरक्षित रहावा, यादृष्टीने काम केले. त्यांनी दीनदलितांच्या उत्थानाकरिता व भारतातील मागासवर्गाच्या प्रगतीसाठी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी संपूर्ण जीवनाचा त्याग केला. माणसाला स्वाभिमानाने जगणे शिकवले. ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र त्यांनी आम्हाला दिला. संविधानामुळे आज सर्वजण सुरक्षित आहे, असे प्रतिपादन शिवसेना माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केडगाव शिवसेनेच्या वतीने आंबेडकर चौक येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री. सातपुते बोलत होते. कार्यक्रमास नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, बबलू शिंदे, संग्राम कोतकर, विठ्ठलमहाराज कोतकर, विजय पोटे आदी उपस्थित होते.