शिंदे-फडणवीस सरकारचा वर्धापनदिन : गुवाहाटीचे तिकीट मिळाल्यास; सुप्रिया सुळेंचा टोला


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
इंदापूर :
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. या सरकारचा आता पुढील काही दिवसात वर्धापनदिन साजरा होणार आहे. या वर्धापनदिनाचे निमित्त साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (र्डीिीळूर र्डीश्रश) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर मिश्किल टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, राज्यातील गद्दार सरकारचा वर्धापनदिन येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी 20 तारखेला गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिले तर सांभाळून राहा. सुप्रिया सुळे इंदापूर दौर्‍यावर होत्या. यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्यातील न्हावी गावातील नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गद्दार सरकारची वर्षपूर्ती आता येते आहे. पण तुम्ही सगळे सांभाळून राहा. 20 तारखेला कुणाला तिकिट दिलं गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलमध्ये राहण्याचे निमंत्रण दिले तर सांभाळून राहा, विचार करा. गद्दारांना खाजगी हॉटेल लागले, खाजगी विमानसुद्धा लागले. गद्दारी करताना कोणालाही वाटलं नाही आपल्या मतदारसंघात जावे, लोकांना विचारावे. गावातील लोकांना विचारावे, त्यांना सांगून निर्णय घ्यावा. तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहाल का? असे विचारावे. तुम्ही पक्ष बदलला, विचारधारा बदलली, सरकार पाडलं, पण लोकांना विश्वासात घ्यावे असे कोणालाही वाटले नाही? गुवाहाटीमध्ये एकमेकांना मिठ्या काय मारल्या, तोकडे कपडे काय घातले, हे सर्व सुट्टीला गेले होते की, देशाच्या सेवेसाठी गेले होते? असे प्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
सरकारने गद्दारी केली यात काही वाद नाही
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कालच एक बातमी वाचली, भाजपाने शिंदे सरकारला तुमचे पाच मंत्री काढून टाकायला सांगितले आहे. मी विचार करते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी इतके वर्ष सत्तेत होती. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेकांना कधी सांगतिले नाही कोणी कोणाला मंत्री करायचे. काँग्रेसने त्यांचे मंत्री करायचे आणि आम्ही आमचे केले.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना प्रश्न विचारला की, मला आता विचार करुन सांगा उद्धव ठाकरे म्हणतात की हे मिंधे सरकार आहे हे मला हळूहळू पटतंय. उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला. त्यांनी हयात असताना उद्धव ठाकरेंना पक्ष दिला, त्यामुळे तो पक्ष कोणालाही घ्यायचा अधिकार नाही, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.
सगळी धोरणे नेहमी शेतकर्‍यांच्या विरोधात
राज्यातील सरकारची आणि केंद्र सरकारची सगळी धोरणे नेहमीच शेतकर्‍यांच्या विरोधात राहिली आहेत. दुधाचे भाव पडले आहेत, कांदा किंवा टोमॅटोला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. खर तर शेतकर्‍यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सातत्याने केंद्र व राज्य सरकारने केला आहे, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!