शहर बँकेच्या घैसास- गुंदेचा पॅनल ने पद्मशाली समाजावर अन्याय केला : श्रीनिवास बोज्जा

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
अहमदनगर शहर सहकारी बॅंकेचे संचालक पदाची निवडणूक अजेंडा जाहीर झालेला असून बॅंकेच्या विद्यमान संचालकांनी पद्मशाली समाजातील एक ही उमेदवार जाहीर न करता समाजावर अन्याय केले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी दिली आहे.
वास्तविक पाहता शहर सहकारी बॅंकेच्या स्थापने पासून पद्मशाली समाजातील अनेक सभासद या बेकेचे असतांना व या बॅंकेवर समजतील दोन संचालक अनेक वर्षांपासून संचालक असतांना अचानक पणे डावलून समाजातील इच्छुक उमेदवारपैकी एक ही उमेदवारास उमेदवारी न देणे म्हणजे समाजावर अन्याय करणे होय. बँकेचे संस्थापक मुकुंद घैसास यांनी वेळो वेळी समाजाला न्याय देण्याचे काम केलेले असून समाज ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असे त्याचीच फळ म्हणून स्व. मुकुंद घैसास यांना अहमदनगर महानगरपालिका मध्ये ही निवडणुकीस पद्माशाली समाजाने मदत केली.तसेच या बॅंकेत समाजातील अनेक गोरगरीब व बिडीकामगारांचे अनेक वर्षांपासून खाते आहे. शहर बँक ही गोरगरिबांची वाली असलेली बँक म्हणून नावाजलेली असताना सध्याचे विद्यमान पॅनल ने सामान्य माणसाला उमेदवारी न देता भांडवलदारांना उमडेवारी दिली ही बाब खेदजनक आहे.
पद्माशाली समाजातील काही पदाधिकाऱ्यांनी समाजावर अन्याय झाल्याचे विद्यमान संचलकांना निदर्शनास आणुन देऊन ही कोणत्याही हालचाली झालेले दिसून येत नाही. जर समाजातील उमेदवारस घैसास -गुंदेचा पॅनल ने उमेदवारी न दिल्यास समाजातील सभासदांना या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याशिवाय पर्याय राहिलेलं नाही. तसेच समाजातील उद्योजकानीही या बाबर गंभीर विचार करावा असे आवाहन पद्मशाली समाजातील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी दिले.
या बैठकीस संजय वल्लकट्टी, दत्तात्रय रासकोडा, पुरषोत्तम सब्बन, संजय बाले, मंदार अडगटला, दिलीप आडगटला, विलास दिकोंडा, मल्लेशम इगे, ज्ञानेश्वर मंगलारप, अभिजित चिप्पा, सुमित इप्पलपेल्ली आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!