संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- शहर पञकार समन्वय समिती, मराठी पञकार परिषद नाशिक विभाग, केडगाव प्रेस क्लब व प्रेस संपादक पञकार सेवा संघ च्या संयुक्त विद्यमाने दीपावली, पाडवा, भाऊबीज फराळ कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष बाबा जाधव, मन्सूरभाई शेख, सुभाष चिंधे, ज्येष्ठ पत्रकार वाघमारे यांच्यासह केदार भोपे, निलेश आगरकर, प्रफुल्ल मुथ्था, नितीन देशमुख, सुधीर पवार, योगेश गुंड, प्रमोद पाठक, संदीप दिवटे, संजय गाडिलकर, अशोक तांबे, अनिल हिवाळे,अल्ताफ शेख, उदय जोशी, महेश कांबळे, बबन म्हञे, विजय मते, आबिद खान, नरेश रासकर, रामदास बेंद्रे, शब्बीर शेख आदिंसह अहमदनगर शहरासह केडगाव प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक ज्येष्ठ छायाचित्रकार समीर मणियार यांनी केले. सूञसंचालन पुढारी व्यवस्थापक अविनाश कराळे यांनी केले.