संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी- राज्याचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर बु. विद्यालयांमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष तथा राहाता बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे पा व श्री मातेरे पा. यांच्या हस्ते झाले.
यावेळी राजेंद्र कापसे पा., सुनील वाघमारे, मुख्याध्यापक श्री.आंबेडकर सर उपस्थित होते.
दरम्यान स्पर्धेत विजयी होणाऱ्या विद्यार्थिनींन उपसभापती बाळासाहेब जपे पा. व श्री मातेरे पा. यांनी रुपये 1 हजार रुपयांचे बक्षीस दिले. यावेळी रांगोळी स्पर्धेचे आयोजन व ठाकरे मॅडम, श्री शेखसर यांनी केले होते.