‘वॉक फॉर राईट साईड’ नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी डॉ. भोसले

रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी चतु:सूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
: जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी शिक्षण, नियमांची अंमलबजावणी, आपत्कालीन काळजी व अभियांत्रिकी उपाययोजना या चतु:सूत्रीची अंमलबजावणी करत वॉक फॉर राईट साईड हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रस्ता सुरक्षा अभियान 2023 चा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.त्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी साहेबराव डावरे, इंडियन ऑईलचे मधुरेंद्र पांडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, अपघाताच्या होणाऱ्या घटना टाळण्यासाठी “फोर ई” या चतु:सुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. विद्यार्थी दशेमध्येच वाहतुक नियमांची माहिती होण्यासाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमधून नियमांची जागृती करण्याबरोबरच पालकांमध्येही जनजागृती करणे तेवढेच गरजेचे आहे. सुरक्षा नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होण्यास मदत होणार असल्याने वाहतुक नियमांची कडक अंमलबजावणी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अपघाताची ठिकाणे आहेत. अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय मदत मिळण्यासाठी अशा ठिकाणापासुन वेळेत रुग्ण्वाहिकांची उपलब्धता होण्याच्यादृष्टीने विविध संस्थांची मदत घेण्यात यावी. तसेच अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांचा जीवनदूत म्हणून गौरव करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
“स्वतः वाचाल तर कुटुंबाला वाचवाल” ही या वर्षीच्या अभियानाची संकल्पना असून प्रत्येकाने वाहन चालवताना आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. वाहन चालवताना सीटबेल्टचा, हेल्मेटच्या वापरासोबतच रस्ते सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वाहन चालविताना प्रत्येक चालकाने वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे सांगत रस्त्यावर चालताना समोरून येणारी वाहने आपल्याला दिसावीत आणि त्यापासून स्वत:ची सुरक्षा करता यावी यासाठी जिल्ह्यात “उजव्या बाजूने चला” ही अभिनव मोहिम अत्यंत प्रभावीपणे राबविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे म्हणाले, वाहतुक नियमांचे पालन न केल्यामुळेच अनेकवेळा अपघात होत असतात. वाहन चालवताना नियमांचे पालन करुन आपल्यामुळे अपघात होणार नाही ही बाब मनी बाळगून अपघातग्रस्तांना मदत करण्याची भावना प्रत्येकामध्ये निर्माण होण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती पवार म्हणाल्या, रस्ता सुरक्षा अभियान 2023 हे वर्षभर राबविण्यात येणार असुन रस्ते सुरक्षा नियमांबाबत जनमानसांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचेअधीक्षक अभियंता श्री.कुलकर्णी, इंडियन ऑईलचे मधुरेंद्र पांडे यांचीही समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन सहाय्यक मोटार निरीक्षक गोरक्ष कोरडे यांनी केले तर आभार कैलास वाघ यांनी मानले.
कार्यक्रमास परीवहन, पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध मोटार वाहन संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!