विहीरी कामात मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत आरोपीस अटक ; ‘नगर एलसीबी’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
श्रीगोंदा : येथील विहीरी कामावरील ३ मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपीस अटक करण्याची कारवाई ‘नगर एलसीबी’ने केली आहे. संजय शामराव इथापे (रा. टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा,जि.अ.नगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील शेतकरी वामन गेणा रणसिंग यांच्या विहीरीवर संजय शामराव इथापे (रा. टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा) याने विहीरीमधील ब्लास्टींगचे कामासाठी मजूर ठेवून त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण, साधने व सुरक्षा न देता मजूर जिलेटीनच्या कांड्या विहीरीचे होलमध्ये भरतांना स्फोट झाला. या घटनेत मजुर सुरज ऊर्फ नसीर युसूफ इनामदार, गणेश नामदेव वांळुज दोन्ही (रा. टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा) व नागनाथ भागचंद्र गावडे (रा. बारडगांव, ता. कर्जत) यांचा मृत्यू झाला, तर ३ मजूर गंभीर जखमी झाल्याने या घटनेस कारणीभूत झाल्यावरुन संजय शामराव इथापे यांच्याविरुध्द श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गु.र.नं. ५८९/२०२४
भादविक ३०४,२८५,२८६,३३७,३३८
सह बारी अधिनियम कलम ३,४,५ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्याचा एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार एलसीबी टिम’ने शोध घेऊन आरोपी संजय इथापे याला मिळालेल्या माहितीवरून हडपसर, (जि. पुणे) येथे अटक केली. त्याला अटक करुन श्रीगोंदा पोलिस ठाण्यात हजर केले. पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करीत आहेत.
ही कारवाई एलसीबीचे पोउपनि तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बबन मखरे, रविंद्र कर्डीले, रोहित मिसाळ, देवेंद्र शेलार, भाऊसाहेब काळे, रविंद्र घुंगासे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे व चंद्रकांत कुसळकर यांच्या टिमने केली आहे.