भिंगार अर्बन बँकेला 9 कोटी 77 लाखांचा ढोबळ नफा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – भिंगार अर्बन बँकेला मार्च 2023 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात रु.9 कोटी 77 लाखांचा ढोबळ नफा झाला असून, आयकर व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे मार्गदर्शक सुचनांनुसार आवश्यक त्या तरतूदी करुन निव्वळ नफा रु.3 कोटी 54 लाखांचा झालेला आहे. मार्च 2023 अखेर बँकेच्या एकूण ठेवी 298.51 कोटी, एकूण कर्ज 195.60 कोटी तसेच एकूण व्यवसाय 494.12 कोटी झालेला असून, निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळविले आहे. बँकेने सभासदांना सातत्याने 15% लाभांश दिलेला असून, चालू वर्षीही 15% लाभांष वितरीत करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याची माहिती भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिलराव मधुकरराव झोडगे यांनी दिली. सभासदांचा, खातेदारांचा बँकेवरील विश्वास बँकेचे कर्मचारी, संचालक मंडळाचे विश्वासपूर्ण काम यामुळेच बँक सातत्याने प्रगती करीत असल्याचे अनिलराव झोडगे यांनी सांगितले.
याप्रसंगी उपाध्यक्ष किसनराव सखाराम चौधरी म्हणाले, भविष्यात अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देण्याच्या अनुषंगाने ग्राहकांना मोबाईल बँकिंग सुविधा बँकेच्या एटीएमद्वारे ग्राहकांच्या सर्व बँकांमधील खात्यामध्ये पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले.
बँकेने सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे बँकेला बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार महाबळेश्वर येथील नॅफकबचे अध्यक्ष ज्योतिदरभाई मेहता यांच्या हस्ते प्राप्त झाला आहे. तसेच एनएएफसीयुबी दिल्ली यांच्यावतीने केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते बँकेचा सन्मान करण्यात आल्याचे ज्येष्ठ संचालक नाथाजी लक्ष्मणराव राऊत यांनी सांगितले.
बँकिंग व्यवसायाबरोबरच सामाजिक जाणिवेने, सभासदांचे हुशार मुलांना प्रोत्साहन देणे, खेळांस प्रोत्साहन देणे, सभासदांकरीता आरोग्य शिबीराचे आयोजन करणे, वृक्षारोपण करणे, रक्तदान शिबीराचे आयोजन इत्यादी समाजाभिमुख उपक्रम राबविल्यामुळेही बँकेची सर्वांगिन प्रगती होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन यांनी सांगितले.
यावेळी संचालक मंडळा सर्वश्री रमेशराव देवराव परभाणे, राजेंद्र जगन्नाथराव पतके, कैलासराव नारायणराव खरपुडे, संदेशराव गोपाळराव झोडगे, विजय मिश्रीलाल भंडारी, विष्णू भानुदास फुलसौंदर, अमोल दत्तात्रय धाडगे, एकनाथराव रतनराव जाधव, श्रीमती कांताबाई शिवराम फुलसौंदर, श्रीमती तिलोत्तमाबाई पोपटराव करांडे, नामदेवराव सोनूजी लंगोटे, तज्ञ संचालक आर.डी.मंत्री, सीए राजेंद्र शेषमल बोरा उपस्थित होते.