संग्राम सत्तेचा वृत्तसेवा (सोमराज बडे)
Online Natwork
पाथर्डी : पाथर्डी तालुक्यात नुकतेच विश्वहिंदू परिषद केद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांच्या आगमन झाले होते. काही नियोजित कार्यक्रमानिमित्त ते तुळजवाडी या ठिकाणी नगर, तिसगाव, पाथर्डी मार्गे जाणार होते. श्री.गायकर हे आपल्या सहकार्यासमंवेत पाथर्डीहून जात असतांना विश्वहिंदू परिषद व हिंदू संघटना व हिंदू समाज यांच्या वतीनं मोठी आतिषबाजी करून पाथर्डी येथे वसंतराव नाईक पुतळासमोर त्यांचा पुष्पहार घालून, श्रीफळ, देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मुकुल गंधे (विश्व हिंदू परिषद जिल्हा सह मंत्री), श्री सोनवणेसर (विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री), देवा पवार (विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री पाथर्डी प्रखंड (तालुका),उद्धव केदार, नितीन बारगजे, किशोर परदेशी, केशव केदार, फक्कडशिंग भोसले, तुषार भडके, अमोल वाघ,शिवनाथ घाटुळ, साईनाथ लहांगे, अशोक भाऊ कुटे, हर्षल बनकर, गणेश पवळे उपस्थित होते.
शंकर गायकर यांचे तिसगाव येथेही स्वागत करण्यात आले. आपल्या या धावत्या भेटीत कार्यकर्त्यांनी केलेल्या आदरतीथ्यामुळे आपण खरोखर भारावून गेलो आहोत असे श्री गायकर यांनी बोलतांना सांगितले.