विशेष पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांची श्री विशाल गणेश मंदिरास भेट
श्री विशाल गणेश मंदिराचा झालेला जिर्णोद्धार नेत्रदिपक – दत्तात्रय कराळे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर – कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात हि श्री गणेशापासून होत असते. नगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात येऊन दर्शन घेतल्याने प्रसन्न वाटते. तसेच श्री विशाल गणेश मंदिराचा झालेला जिर्णोद्धार हा खरोखर नेत्रदिपक आहे. पूर्वी नगरमध्ये असताना अनेक वेळेस श्री विशाल गणेश मंदिरात दर्शनासाठी येण्याचा योग आला. त्यानंतर पुन्हा एकदा नगरमध्ये आल्याने आपोआपच श्री विशाल गणेश मंदिरात येण्याची ओढ लागली. आणि आज या ठिकाणी येवून दर्शन घेतल्याने मनस्वी आनंद वाटत असल्याचे प्रतिपादन विशेष पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले.
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे विशेष पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांनी भेट दिली असता त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करताना उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे व सचिव अशोकराव कानडे आदी उपस्थित होते.
यावेळी सचिव अशोकराव कानडे यांनी मंदिराच्या जिर्णोद्धाराची आणि राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.