विधान परिषद पदवीधर मतदार द्विवार्षिक निवडणूक: मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सूचना

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :
विधान परिषद पदवीधर मतदार द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून यासाठी 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचे मतदान मतपत्रिकेवर होणार असून मतदान कसे करावे याबाबत निवडणूक आयोगाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व मतदारांनी मतदान प्रक्रियेचे नियम व अटी जाणून घ्याव्यात असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
👉विधानपरिषद निवडणूक सन 2023 साठी मतदान कसे करावे
मतदानाच्या उददेशाने फक्त जांभळा स्केच पेन वापरा जे तुम्हाला बॅलेट पेपरसह दिले जाईल. इतर कोणतेही पेन, पेन्सिल, बॉलपाईंट पेन किंवा इतर कोणतेही चिन्हांकीत साधन वापरु नका, कारण त्यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल.
प्राधान्यक्रम नमूद करावयाच्या स्तंभामध्ये 1 संख्या लिहुन मतदान करा तुम्ही तुमची पहीली पसंती म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर अंक 1 हा फक्त एकाच उमेदवाराच्या समोर लिहावा. निवडुन येणाऱ्या उमेदवाराची संख्या एकापेक्षा जास्त असेल तरीही संख्या 1 ही फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहावी. तुमच्याकडे तितकीच प्राधान्ये आहेत जितकी निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत. उदाहरणार्थ जर पाच उमेदवार असतील, तर तुम्ही तुमच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर 1 ते 5 पर्यंत प्राधान्यक्रम लिहु शकता. तुमची पुढील प्राधान्य क्रमांके ही उर्वरीत उमेदवारांच्या नावांसमोर दिलेल्या रकान्यात 2,3,4,5 या क्रमाने नोंदवावीत. कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर फक्त एकच संख्या टाकल्याची खात्री करा आणि समान संख्या जास्त उमेदवारांच्या नावासमोर लिहीली जाणार नाही याची खात्री करा. प्राधान्य फक्त आकडयांमध्ये सुचित करावा म्हणजे 1,2,3, इत्यादी आणि एक, दोन, तीन, अशाप्रकारे शब्दांमध्ये लिहीले जाणार नाही याची खात्री करा. 1,2,3, हा प्राधन्यक्रम इंग्रजी, देवनागरी किंवा रोमन आकडयांमध्ये उदा, 1,2,3, I, II, III, इत्यादी वैध आहे.मतपत्रिकेवर तुमचे नांव किंवा कोणतेही शब्द लिहू नका आणि तुमची स्वाक्षरी किंवा अदयाक्षरे टाकु नका तसेच तुमच्या अंगठ्याचा ठसा लावु नका. यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल. तुमच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर (“) असे किंवा X असे चिन्ह देवू नये. आपला पसंतीक्रम अंकातच लिहावा उदा. 1,2,3, इ. तुमची मतपत्रिका वैध होण्यासाठी, तुमच्या मतपत्रिकेमध्ये पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर 1 हा प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. इतर प्राधान्यक्रम वैकल्पीक आहेत, म्हणजे तुम्ही 2,3 ईत्यादी प्राधान्यक्रम नोंदवा अथवा नोंदवू नका.
👉अवैध मतपत्रिका
ज्यावर 1 हा प्राधान्यक्रम दिलेला नाही ती मतपत्रिका अवैध ठरेल. 1 हा प्राधान्यक्रम एकापेक्षा जास्त उमेदवाराच्या नावासमोर लिहीला तर ती मतपत्रिका अवैध ठरेल. 1 हा पसंतीक्रम कोणाच्या नावासमोर दिला आहे, हे स्पष्ट होत नसेल तर मतपत्रिका अवैध ठरेल. 1 हया पसंतीक्रमासोबतच इतर पसंतीक्रम 2,3 हे एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहीले असतील तर मतपत्रिका अवैध ठरेल. पसंतीक्रम हा संख्येऐवजी शब्दांमध्ये लिहीला असेल तर उदा. 1,2,3 ऐवजी एक दोन तीन असे लिहीले असेल तर मतपत्रिका अवैध ठरेल. मतपत्रिकेवर मतदाराची ओळख पटेल अशी कोणतेही चिन्ह किंवा मतपत्रिकेवर मतदाराची ओळख पटेल असे कोणतेही शब्द लिहीला असेल तर मतपत्रिका अवैध ठरेल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुरविलेल्या जांभळया स्केचपेन व्यतीरिक्त इतर कोणत्याही पेनने पसंतीक्रम लिहीला असेल तर अशी मतपत्रिका अवैध होईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!