संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई ; विधान परिषदेच्या १० जागांसाठी सोमवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. भाजपचे पाच उमेदवार निवडून आले. तर सत्ताधारी महाविकास आघाडीचे चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस) यांचा पराभव झाला.
रात्री ९.३० वाजता पहिल्या पसंतीचा मतांचा कल हाती आला. त्यामध्ये भाजपला पहिल्या पसंतीची १३४, तर आघाडीला १५१ मते मिळाली. तत्पूर्वी, सकाळी ९ वाजता मतदानास प्रारंभ झाला. सायंकाळी चारपर्यंत सर्व २८५ आमदारांनी मतदान केले. ५ वाजता मतमोजणीस प्रारंभ होण्यापूर्वी आघाडीच्या बाजूने भाजपच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतला. दोन मतांवर राष्ट्रवादी व भाजपने आक्षेप नोंदवले. परिणामी पुन्हा दीड तास मतमोजणीचा खोळंबा झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही मते बाद ठरवली. रात्री ९ वाजता वैध २८३ मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाली. पहिल्या पसंतीच्या मतांवर भाजपचे ५, राष्ट्रवादीचे २, शिवसेनेचे २ उमेदवार विजयी ठरले. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात दुसऱ्या फेरीमध्ये चुरस निर्माण झाली. रात्री साडेदहा वाजता दुसऱ्या फेरीत भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी ठरले.
👉प्रवीण दरेकर, भाजप मते : 29, विजयी
राम शिंदे, भाजप मते : 30, विजयी
श्रीकांत भारतीय, भाजप मते : 30, विजयी
उमा खापरे, भाजप मते : 27, विजयी
प्रसाद लाड, भाजप मते : 28, विजयी
चुरशीच्या निवडणुकीत प्रसाद लाड यांनी २८ मते घेऊन विजय मिळवला.
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी मते : 29, विजयी रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादीमते : 28, विजयी आमशा पाडवी, शिवसेना मते : 26, विजयी सचिन अहिर, शिवसेना मते : 26, विजयी भाई जगताप, काँग्रेस मते : 26, विजयी चंद्रकांत हंडोरे, काँग्रेस मते : 22, पराभूत