विद्यार्थिनींनी केल्या पोलीस निरीक्षकांकडे तक्रारी.. मुलींच्या संरक्षणासाठी ‘तिची छेड काढली जातेय का?’ माहिती पत्रकांचे वाटप

विद्यार्थिनींनी केल्या पोलीस निरीक्षकांकडे तक्रारी.. मुलींच्या संरक्षणासाठी ‘तिची छेड काढली जातेय का?’ माहिती पत्रकांचे वाटप
नगरच्या ‘भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयामध्ये’ पार पडले चर्चासत्र
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : महिला-मुलींच्या संरक्षणासाठी पुढाकार घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नगरच्या भाऊसाहेब फिरोदीया हायस्कुलमध्ये जनजागृती चर्चासत्र घेऊन तिची छेड काढली जातेय का? या माहिती पत्रकांचे तब्ब्ल २००० विद्यार्थ्यांना वाटप केले. त्यावेळी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी सांगितल्या.
शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींची छेड काढली जाऊ नये आणि काढलीच तर पुढे काय करावे? कशी मदत मिळवावी? यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांनी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत त्यांनी फिरोदियाच्या विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे देत भारतीय दंड संहितेमधील विनयभंगाची व्याख्या समजावून सांगून लहान मुलांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा काय आहे? याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच मुलांनी कोणत्याही प्रकारे कोणत्याही मुलीची छेड काढू नये आणि असा काही प्रकार झाल्यास मुलींनी या प्रकाराला कसे सामोरे जावे? तक्रार कशी करावी? आपले नाव कसे गोपनीय राहील याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी कोतवाली पोलिस बांधवांनी तयार केलेले ऑनलाईन फसवणूकीबाबतचे पत्रकही वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी घरी जाऊन देण्यात आलेली दोन्ही पत्रके आई-वडील, बहिण-भाऊ यांना वाचून दाखवावीत अशा विद्यार्थ्यांना सूचना केल्या.
यावेळी भाऊसाहेब फिरोदिया माध्यमिक विद्यालयाचे उपप्रायार्य रावसाहेब बाबर, प्राध्यापिका आशा सातपुते, विष्णु गिरी, बाळू वाव्हळ, शोभा पालवे व इतर शिक्षक-कर्मचारी, पोलीस हवालदार देवेंद्र पांढरकर, राजेंद्र गर्गे उपस्थित होते.

आवाहनानंतर मुलींकडून तक्रारींचा पाढा !
‘कुणी काही त्रास देत असेल तर सांगा कारवाई करू’ पोलीस निरीक्षक यादवांनी असे आवाहन केल्यानंतर मुलींनी अनेक तक्रारी केल्या.घराच्या आजूबाजूचे, शाळाबाह्य मुले,विद्यालयातील काही मुले तसेच काही स्कूल व्हॅनचे चालक आदींबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. आता त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे यादव यांनी जाहीर केले.

तब्बल दहा हजार माहिती पत्रकांचे होणार वाटप !
मुली व महिलांना त्रास झाल्यानंतर तक्रार कशी करावी? कोठे करावी? अशा प्रसंगात सामोरे कसे जावे? याबाबतची तब्बल दहा हजार माहिती पत्रके तयार करण्यात आली आहेत.वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. जर कोण छेड काढत असेल तर बिनधास्तपणे तक्रार करावी संबंधिताचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!