संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
लाईट बिल फ्रॉड / AnyDesk App / Team viewer App फ्रॉड ; बऱ्याच व्यक्तींची याप्रकारे फसवणूक झाली आहे. याप्रकरे होते विजग्राहकांची फसवणूक
👉1. मोबाईल वर sms मेसेज येतो की, आपण या महिन्याचे लाईट बील भरले नाही. आपले लाईट कनेक्शन कट करण्यात येणार आहे.
👉2. नंतर फ्रॉड व्यक्तीकडून कॉल येतो की, सर तुम्ही लाईट बील भरले नाही, कनेक्शन कट होईल, जरी तुम्ही लाईट बीले भरले असेल तरी ते अपडेट झाले नाही. अशा काही भुलथापा देतात.
👉3. नंतर व्यक्तीला AnyDesk Appl Teamviewer Appl या सारखे कोणतेही अँप डाउनलोड करायला सांगुन नंतर त्या अॅप मधील कोड विचारतात तो कोड सांगितल्यावर तुमच्या मोबाईल चा सर्व ॲक्सेस समोरच्या व्यक्तीकडे जातो. व नंतर तो तुम्हाला Auto SMS Forwarding Appl डाउनलोड करायला सांगुन तुमच्या मोबाईल वर येणारे सर्व मेसेज त्यांच्या मोबाईल वर फॉरवर्ड करुन घेतात. त्यामुळे तुमच्या मोबाईल वर येणारे सर्व ओटीपी मेसेज समोरच्या व्यक्तीच्या मोबाईल वर जातात.
👉4. नंतर तुम्हाला लाईट बीलच्या ओरीजीनल साईटवर रु किंवा 10 रु पेमेंट करायला सांगतात जे तुमच्या ओरीजीनल लाईट बील कंपनीला तुमच्या नावावर जमा होते. परंतु लाईट बील भरतांना तुम्ही तुमच्या Debit Card, Credit Card, ATM Card ची माहिती भरतात. तुमचा CVV नंबर टाकतात ते समोरचा फ्रॉड व्यक्ती बघून घेतो. तो तुमच्या Debit Card, Credit Card, ATM Card ची माहीती वापरुन तुमच्या अकाउंट वरील सर्व पैसे वेगवेगळया अकाउंटला ट्रांसफर करुन घेतो. त्यासाठी लागणारा OTP तुमच्या मोबाईल वरुन फ्रॉडच्या मोबाईलवर Auto SMS Forwarding App या ॲपच्या माध्यमातून सेंड होतो.
अशा प्रकारे सायबर फ्रॉड करणारा व्यक्ती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर AnyDesk App / Teamviewer App या सारखे इतरही ॲप डाउनलोड करायला सांगून आपल्या मोबाईलचा पूर्ण अक्सेस घेतो. Auto SMS Forwarding App या सारखे ॲप डाउनलोड करायला सांगून तुमच्या मोबाईल वरील सर्व SMS मेसेज आपल्या मोबाईलवर घेऊन तुमचे बँकेतून येणारे OTP मिळवतो.
या सारख्या सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी कुणाच्या सांगण्यावरुन कोणतेही App आपल्या मोबाईलमध्ये Download करु नका. Install करु नका. हे सर्व App हे Play Store वर उपलब्ध आहेत, म्हणून याच्या माध्यमातून आपली फसवणूक होणार नाही. अशा भ्रमात राहू नका. लाईट बील संबंधात आपल्या MSEB ऑफीसला भेट दया. किंवा Online लाईट बील भरण्यासाठी आपले Phone Pe, Google Pe, Bhim App यासारख्या नामांकीत Payment App चा वापर करा. तसेच तुम्ही https://wss.mahadiscom.in या MSEB च्या अधीकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे Light Bill डाऊनलोड करु शकतात तसेच लाईट बील भरु शकतात.
👉सायबर तक्रारीसाठी https://cybercrime.gov.in/ यावर ऑनलाईन तक्रार करु शकतात. तुम्ही Toll Free 1930 या क्रमांकावर फोन करु शकतात. आपल्या जवळच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात सायबर फ्रॉडची तक्रार देऊ शकतात.