विकासाचा सांख्यिकी आरखाडा तयार करणारा नगर जिल्हा राज्यात एकमेव-ना.विखे पाटील

विकासाचा सांख्यिकी आरखाडा तयार करणारा नगर जिल्हा राज्यात एकमेव-ना.विखे पाटील
व्यापारी असोसिएशनच्या वतीने संवाद कार्यक्रम संपन्न
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यादेवीनगर: विकासाचा सांख्यिकी आरखडा तयार करणारा अहील्यानगर जिल्हा राज्यात पहीला असून,औद्योगिक आणि तिर्थ क्षेत्र पर्यटनातून होणारी गुंतवणूक व्यापारी पेठेवरही सकारात्मक परीणाम करण्यास कारणीभूत ठरेल असा विश्वास महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.


अहील्यानगर आडते बाजार मर्चन्टस असोसिएशन व कांदा भाजीपाला फळे फुले अडत्यांचे असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी व्यापारी क्षेत्रातील सर्व घटकांशी संवाद साधला. आ.संग्राम जगताप अध्यक्ष अशोक गांधी उपाध्यक्ष गोपाल मणियार सेक्रेटरी संतोष बोरा राजेंद्र बोरा अशोक लाटे भाजपाचे अध्यक्ष अभय आगरकर माजी नगराध्यक्ष वसंत लोढा धनंजय जाधव निखिल वारे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची परीस्थिती आज बदलत आहे.कोव्हीड संकटा नंतरही देशाची अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी केलेल्या उपाय योजनामुळे आज भारताची अर्थव्यवस्था प्रगतीच्या दिशेने जात आहे.जगातील इतर देशाची परीस्थिती पाहीली तर भारत देश अर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याचे चित्र आहे.
देशाचा विकास साध्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटपाथवरील विक्रेत्यापासून ते उद्योजकापर्यत सर्वानाच पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे.सर्वाचे प्रयत्न देशाच्या अर्थव्यवस्थेला पाच ट्रीलीयन डाॅलर अर्थव्यवस्थेचा मार्ग अधिक सुकर करून देईल आशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली.
नगर जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये प्रामुख्याने औद्यगिक विकासाला प्राधान्य देण्यात आल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की तिर्थ क्षेत्राचा विकास करून नवी बाजारपेठ विकसित करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचा सांख्यिकी आरखाडा तयार केला असून यामाध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहीती त्यानी दिली.
शहरातील बाजारपेठेची परंपरा खूप मोठी असून शहराच्या व जिल्ह्याच्या विकासात व्यापारी बंधूचे योगदान खूप मोठे आहे.केंद्र सरकारकडे वस्तूसेवा करातील अडचणी सोडविण्याची ग्वाही देताना आतापर्यत अर्थमंत्र्यांनी घेतलेल्या परीषदांमधून जीवनावश्यक वस्तूवरील कर रद्द किंवा कमी करण्याचा निर्णय करून जनतेला आणि व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.आता हा कर भरण्यात सुध्दा सुसूत्रता आली असल्याचे विखे पाटील म्हणाले.याप्रसंगी आ.संग्राम जगताप अध्यक्ष गांधी राजेंद्र बोरा निखील वारे यांची याप्रंसंगी भाषण झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!