वकील दांपत्याचा खून करणारा पाचवा आरोपी अटक ; राहुरी पोलिसांची कारवाई

वकील दांपत्याचा खून करणारा पाचवा आरोपी अटक ; राहुरी पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहुरी : वकील दांपत्याचा खून करणारा पाचवा आरोपीस पकडण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. कृष्णा उर्फ बबन सुनील मोरे (रा. उंबरे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस ठाण्याचे पोनि संजय ठेंगे यांच्या सूचनेनुसार पोउपनि चारुदत्त खोंडे, पोहेकाॅ पारधी, पोकाॅ अंकुश भोसले, पोकाॅ सतीश कुराडे, पोहेकाॅ विकास साळवे ,पोहेकाॅ अशोक शिंदे,पोना नागरगोजे ,पोकाॅ पाखरे, पोना बागुल आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की,‌राहुरी पोलीस ठाण्यात गुरंनं ७५/२०२४ मध्ये वकील दांपत्यास कोर्टातून पळून नेऊन त्यांचा खून करून विहिरीत टाकणाऱ्या ५ जणांच्या टोळीपैकी चार आरोपी २७ जानेवारी २०२४ रोजी अटक करण्यात आलेले होते.फरार पाचवा आरोपी कृष्णा उर्फ बबन सुनील मोरे (रा. उंबरे) याच्याबाबत पोनि संजय ठेंगे यांना त्याच्या ठावठिकाणबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस ठाण्याचे तपास पथक व वांबोरी बीटचे पथकाने त्यास तात्काळ अटक केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!