संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः घरातील विवाह समारंभासाठी लॉकरमध्ये ठेवण्यात आलेले दागिने घरी आणून कपाटात ठेवलेले असताना अज्ञात चोरट्याने 64 तोळे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा ऐवज चोरट्याने विवाह समारंभाच्या गडबडीत नजर चुकवून चोरून नेल्याची अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरातील रेणावीकर शाळेच्या मागे उदय हाऊसिंग सोसायटी येथे शनिवारी दि.8 ते रविवारी दि.9 मार्च या दरम्यान घडल्याचे समोर आले आहे. याबाबत तोफखाना पोिलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अॅड. निखिल बबन वाकळे (वय34,रा.उदय हौसिंग सोसायटी, रेणावीकर शाळेच्या मागे, अ.नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, त्यांचा लहान भाऊ मनोहर याचे 7 मार्च रोजी लग्न असल्याने त्यांनी लग्न समारंभाकरिता लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घरी आणले. लग्नाच्या दिवशी घरातील लोकांनी सर्व दागिने अंगावर घातले होते. दिवसभर अंगावर दागिने ठेवून रात्री 8 वाजल्याच्या सुमारास अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने घरातील कपाटामध्ये ठेवले होते. त्यानंतर 9 मार्च रोजी सकाळी घरातील दागिने
लॉकर मध्ये ठेवण्याकरिता त्यांनी पत्नीस मागितले. त्यामुळे त्यांच्या पत्नीने कपाटात ठेवलेले दागिने पाहिले असता त्यांना ते मिळून आले नाही. यावरून त्यांनी घरातील सर्व सदस्यांना दागिन्याबाबत विचारणा केली असता, कोणास काही एक सांगता आले नाही.
यावरून त्यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरट्याने कपाटातून दागिने चोरून नेले आहेत. यामध्ये 15 ग्रॅम वजनाचे कानातले सोन्याचे दोन जोड, 35 ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार, 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन नेकलेस, 23 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दोन चेन व दोन पेंडल, 19 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन लेडीज चेन, 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान बाळाच्या कानातील सहा जोड, 19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक कडे, 70 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 21 अंगठ्या, 9 ग्रॅम वजनाचे लहान बाळाचे सोन्याचे कडे, 38 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, 5 ग्रॅम वजनाच्या काळ्या मण्याच्या म नगट्याचा जोड, 79 ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक ब्रासलेट, 7 ग्रॅम वजनाचे एक डायमंड मंगळसूत्र, 74 ग्रॅम वजनाचे सोन्याचे साखळीचे गुलाबाचे आकाराचे मंगळसुत्र, 33 ग्रॅम वजनाचे काळ्या मण्यातील मंगळसुत्र 7 ग्रॅम वजनाचे मोरनी, एन नावाच्या दोन पेडल, दोन बाळ्या व दोन लटकन, 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले स्टड, 1 जोड दोन वेगवेगळे व 1 छोटे ब्रेसलेट, 70 ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे ब्रासलेट, 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक कडे, 40 ग्रॅम वजनाच्या पिळ्याच्या सोन्याच्या चार अंगठ्या, 27 ग्रॅम वजनाचे त्यात चांदीचे पैजण एक जोड, चांदीची चैन एक व दोन पुष्कराज खडे, असे 64.7तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 27 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा ऐवज चोरुन नेले.
या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी अॅड. निखिल वाकळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली. तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गायधनी हे करीत आहे.