संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर –वैभवशाली इतिहासासोबतच देदीप्यमान परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राला अधिक समृद्ध करण्यासाठी अनेकांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या कार्याला पाठबळ देणे, पाठीवर कौतुकाची थाप देणे, हे समाज म्हणून आपले कर्तव्यच आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या ९ वर्षांपासून लोक सत्ता संघर्ष ही संस्था आपले कर्तव्य अशा मान्यवरांना पुरस्कारुपी सन्मान देऊन पार पाडलेले आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, प्रशासन अशा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘लोक सत्ता संघर्ष’ पुरस्काराने गौरव करण्यात येतो.महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असा नावलौकिक मिळवलेल्या, ‘लोक सत्ता संघर्ष’ पुरस्कारां’चा भव्य सोहळा ५ मे २०२३ रोजी माऊली संकुल झोपडी कँन्टीन येथे होणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक राहुल येमुल, सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे अँड. सुनील सौंदरमल,चंद्रपूर अर्बनचे संस्थापक अध्यक्ष रोहित बोम्मेवार, राज्य पतसंस्था फेडरेशनचे संदीप माळी,सहकार क्षेत्रातील डॉक्टरेट डॉ. मनोज कुमार, जनता सहकारी बँकेचे चेअरमन अलमुद्दीन वाहीद,तसेच अहमदनगर न्यू लाॅ काँलेजचे प्राचार्य एम.एम.तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार
पत्रकार राम तांबे, शिक्षकरत्न कांचन पापडेजा,कर्तव्यदक्ष आधिकारी पो.नि. विजय करे,नाट्य क्षेत्रातील सतिष लोटके,आध्यात्मिक क्षेत्रातील गणेश महाराज, सहकार क्षेत्रातील लक्ष्मण गायके, बँक राजेंद्र आंण्डे गौरविण्यात येणार आहे.
तसेच अध्यापक विद्यालयात उल्लेखनीय कार्य करणारे विलास विलायते.
लोक कलेच्या माध्यमातून जनजागृती समाज जागृती करणारे शाहीर शिवाजी शिंदे यांना कलारत्न, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे योगेश साठे यांना समाजभूषण व उद्योग क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या प्रदिप गोरडे यांना कृषिरत्न पुरस्कार व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या पुनम वन्नम यांच्या बरोबर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव सोहळा शुक्रवारी संपन्न होत असून आपण या सर्वांनी या सन्मान सोहळ्यात उपस्थित राहावे असे आव्हान संयोजकाकडून करण्यात आले आहे.