संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी - नागनाथ गर्जे यांच्या लेखणीतून स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावरील संघर्षमय जीवनाचे वर्णन करणारे ‘संघर्ष पुरुष’ या विशेषाकांचे प्रकाशन सोमवारी (दि.१२ डिसेंबर) या स्व मुंडेंच्या जयंतीदिनी भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले.
पाथर्डीचे कट्टर समर्थक माजी शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष नागनाथ गर्जे यांनी आजपर्यंत स्व: मुंडेंच्या जयंतीचे औचित्य साधून चार वेळेस ‘संघर्ष पुरुष’ या विशेषांकाचे प्रकाशन केले आहे. पाचव्यांदा विशेषाकांचे प्रकाशन सोमवारी ( दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी गोपीनाथगडावर लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खासदार प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी नागनाथ गर्जे यांचे विशेषांक छापल्याबद्दल कौतुक केले. यावेळी राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चाचे अहमदनगर दक्षिणचे सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे, पाथर्डी तालुक्यातील मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक मुंडेभक्त प्रा.सुनील पाखरे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांना ‘संघर्ष पुरुष’ या विशेषाकांचे वाटप करण्यात आले .