लेखी आश्वासनानंतर थापलिंग रस्त्याचे भोसले यांचे आत्मदहन मागे
(महेश भोसले)
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
संगमनेर : तालुक्यातील पठारावरील वरवंडी येथील थापलिंग देवस्थान ते ठाकरवाडी रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे कंटाळलेल्या वरवंडी ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी करूनही रस्त्याचे काम अर्धवट राहिलेले आहे ठेकेदाराला ६० टक्के रक्कम अदा होऊनही रखडलेल्या कामाबद्दल रिपाईचे पठार विभाग प्रमुख संपत भोसले यांनी नुकताच आत्मदहनाचा इशारा दिला होता या आंदोलनाची शासन स्तरावर तात्काळ दाखल घेतली गेली आणि ३० नोव्हेंबर पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल असे शासन शासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यामुळे संपत भोसले यांनी काल आत्मदहन आंदोलन मागे घेतले.
सविस्तर वृत्त असे की गेले तीन ते चार वर्षापासून थापलिंग देवस्थान ते ठाकरवाडी हा रस्ता दळणवळणासाठी योग्य राहिला नव्हता याबाबत वरवंडी ग्रामस्थांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला होता तेव्हा निदर्शनात आले होते की यातील ठेकेदार ज्ञानेश्वर दिघे यांना या कामाचे ६० टक्के रक्कम अदा करण्यात आली होती परंतु वास्तवात काम अर्धवट राहिले होते म्हणून रिपाईचे पठार भाग प्रमुख संपत भोसले यांनी शासनाला हे काम लवकर पूर्ण न केल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता काल ते आत्मदहनाच्या तयारीत असताना अश्वी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सोनवणे यांनी अशी पोलीस ठाण्यात याबाबत बैठक बोलावली यावेळी जिल्हा परिषदेचे उपा अभियंता जे.पी. गुंजाळ शाखा अभियंता एस.एस.अहिरे के.डी. बोरसे यांनी संपत भोसले यांना लेखी आश्वासन दिले की या रस्त्याचे काम ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण केले जाईल यावेळी आचारसंहिता सुरू असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या कारणाने श्री.भोसले यांनी आत्मदहन आंदोलन तुर्त मागे घेतले .प्रसंगी रिपाईचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके मराठा आघाडीचे गौतम वर्पे एकनाथ वर्पे राजाबापू वर्पे उल्हास गागरे सुभाष गागरे संतोष वर्पे सागर शिंदे भरत भोसले राजाराम वर्पे प्रदीप भोसले आदि उपस्थित होते.