लाखांची पेंड घेऊन पैसे न देता फसवणूक

लाखांची पेंड घेऊन पैसे न देता फसवणूक
👉नगर शहरातील दुकान मालक, हाॅटेल व्यावसायिकासह ५ ते ६ जणांवर गुन्हा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर: विश्वासाने पाठविलेले सुमारे १ लाख रूपये किंमतीची सरकी पेंड खाली करून घेत पैसे न देता व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी व्यावसायिक राहुल भारत पवार (वय ३०, रा. मिरजगाव ता. कर्जत) यांनी सोमवारी (दि.१६) रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच ते सहा जणांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महावीर ट्रेडर्सचा मालक दीपक गुगळे, शेंडी बायपास येथील हॉटेल किनाराचा मालक देविदास येवले, वेटर हरीराम बाबुराव उजागरे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व पिकअपमधील दोन ते तीन अनोळखी यांच्या विरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी पवार यांची छत्रपती जिनिंग प्रेसिंग ॲण्ड आँईल मिल नावाची तेल गिरणी आहे. त्यांना रविवारी (दि. १५) दुपारी साडे तीनच्या सुमारास गुगळे याने फोन करून २०० बॅग सरकी पेंड मागितली. पवार यांच्याकडे माल शिल्लक नसल्याने त्यांनी त्यांच्याकडे कामास असलेला
अनिकेत गणपत शिंदे यांच्या टेम्पोतून ७० बॅग गुगळे यांना पाठविल्या. दरम्यान, गुगळे याने शिंदे यांना फोन करून ६० बॅग चांदणी चौकात येणार्या पिकअपमध्ये टाकण्यास सांगितल्या व उर्वरित १० बॅग शेंडी बायपास येथील किनारा हॉटेल येथे आणण्यास सांगितल्या व पैसे तेथे आल्यावर देतो, असेही कळविले.
टेम्पो चालक शिंदे यांनी चांदणी चौकात आलेल्या पिकअप मध्ये (नंबर माहिती नाही) ६० बॅग टाकल्या. पिकअपमध्ये दोन ते तीन अनोळखी व्यक्ती होते. ते बॅग घेऊन सुप्याच्या दिशेने गेले. शिंदे यांनी उर्वरित १० बॅग शेंडी बायपास येथील किनारा हॉटेलवर नेल्या. तेथील मालक, वेटर यांनी बॅग खाली करून घेतल्या व पैसेही दिले नाही. फसवणूक झाल्याचे पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार एम.टी.विधाते करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!