👉उपाध्यक्षपदी वैभव साळवे : सचिव पदी विकास साळवे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर- महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट मोफुसिल स्टेनोग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून शासकीय विभागात कार्यरत असणा-या लघुलेखक यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सुरु आहे. संघटनेच्या प्रदेश कार्यकारणी मार्फत जिल्हा कार्यकारणी निवडीचा कार्यक्रम राज्यभरात सुरु आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्हास्तरीय शासकीय लघुलेखकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत लघुलेखक जिल्हा कार्यकारणीच्या जिल्हाध्यक्षपदी प्राजक्ता सुरेश आघाव यांची तसेच उपाध्यक्षपदी वैभव एकनाथ साळवे आणि सचिवपदी विकास देविदास साळवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्येष्ठ लघुलेखक तथा नाशिक महसूल विभागीय आयुक्तांचे स्विय सहायक सुरेश आघाव यांचे मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये वरिष्ट सनदी तसेच उच्च पदस्थ अधिका-यांच्या कार्यालयीन कामकाजात सहाय्य होणेकामी लघुलेखक तथा स्विय सहाय्यक यांची जबाबदारी मोठी असते. अनेक विभागात लघुलेखक कार्यरत आहेत. इतर शासकीय अधिकारी व कर्मचा-याप्रमाणे लघुलेखकांचे विविध प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करून सोडविण्यासाठी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट मोफुसिल स्टेनोग्राफर असोसिएशन ही मध्यवर्तीय संघटना कार्यरत आहे. राज्यस्तरावरन देण्यात आलेल्या निर्देशानुसार सध्या जिल्हानिहाय लघुलेखक जिल्हा कार्यकारणीच्या निवडी सुरु आहेत त्यानुसार रविवारी जिल्हयातील विविध शासकीय विभागात कार्यरत असणा-या लघुलेखकांची एकत्रीत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात मार्गदर्शक सुरेश आघाव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आलेली आहे. अध्यक्षपदी प्राजक्ता सुरेश आघाव यांची तसेच उपाध्यक्षपदी वैभव एकनाथ साळवे आणि सचिवपदी विकास देविदास साळवे, खजिनदारपदी ज्ञानदेव लोणारे, महिला प्रतिनिधी रजनी जाधव आणि कार्यकारणी सदस्य म्हणून संतोष काथवटे, अशिष राऊत, अनिल सावेकर, कैलास भडके व मुकेश कुलथे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारणीचे मार्गदर्शक म्हणून सुरेश आघाव यांचेकडे नवनिर्वाचीत पदाधिका-यांनी जबाबदारी सोपविली आहे. सदर जिल्हा कार्यकारणीच्या निवडीवर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट मोफुसिल स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपुर यांनी शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान लघुलेखकांचे प्रश्न राज्यस्तरीय संघनेच्या पदाधिका-यांच्या दिशानिर्देशात सोडविले जातील. संघटना लघुलेखकांसाठी परिवार म्हणून काम करेल असा निर्वाळा नवनिर्वाचित अध्यक्षा प्राजक्ता आघाव, उपाध्यक्ष वैभव साळवे व सचिव विकास साळवे या पदाधिका-यांनी दिला आहे.