लग्नाला उपस्थित राहण्यासाठी कोरोना चाचणी अनिवार्य; ‘या’ राज्याचा नवा नियम

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

मध्यप्रदेश – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे काही राज्यात कोरोना निर्बंध अद्याप शिथील करण्यात आले नाहीत. दरम्यान, मध्य प्रदेशात कोरोना संसर्गाची गती वाढत असताना आता हा संसर्ग कमी करण्यासाठी विवाह समारंभात हजेरी लावणार्‍या लोकांची संख्या पुन्हा एकदा निश्चित करण्यात आली आहे, परंतु या समारंभात जो उपस्थितीत राहिल त्याला कोरोना चाचणी करावी लागणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जिल्ह्यांच्या संकट व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना संबोधित करताना सांगितले की, आता वधू-वरांकडील केवळ २०-२० व्यक्ती लग्नात सहभागी होऊ शकतील. यासह लग्नात सहभागी झालेल्या सर्व व्यक्तींसाठी कोरोना चाचणी अनिवार्य असणार आहे. आपत्कालीन व्यवस्थापन समित्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे १५ जूनपर्यंत नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहे.

यासह मुख्यमंत्री चौहान यांनी असेही सांगितले, आमदारांना आता गरजूंच्या मदतीसाठी आमदार निधीपैकी ५० टक्के निधी वापरता येणार आहे. कोरोनाचा परिणाम लक्षात घेता राज्य सरकारने अशी व्यवस्था केली आहे की, कोरोना संसर्गाचे संकट अजून संपलेले नसून तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. राजकीय, सामाजिक उपक्रम, मिरवणुका, गर्दीच्या ठिकाणांवरील व्यवहार प्रतिबंधित असेल. शाळा-महाविद्यालय, खेळ, स्टेडियममधील कार्यक्रम इत्यादींवरही बंदी असणार आहे.

राज्यात संसर्ग नियंत्रणात आहे. गाव, प्रभाग, शहर व जिल्हा पातळीवरील संकट व्यवस्थापन समित्यांनी घेतलेली जबाबदारी, परिश्रम व सहकार्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. त्यामुळे आता परिस्थिती चांगली आहे. आज २७४ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली असून वीस जिल्ह्यांत एकही नवे रूग्ण आढळले नाही. भोपाळ, इंदूर आणि जबलपूरमध्ये दोन अंकी रूग्णांची नोंद करण्यात येत आहे. पॉझिटिव्ही दर ०.३ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!