👉अहमदनगरला भाजपचे दिग्गज नेते येणार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे अहमदनगर जिल्ह्यात आले असता, शेवगाव-पाथर्डी तालुक्याच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते पुष्पहार गुच्छे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी खा.सुजय विखे पा. माजीमंत्री बबनराव पाचपुते, भाजपा अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे भाजपाचे तीन दिग्गज नेते नगर शहराच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार दि. १७ नोव्हेंबर रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नव्या रेल्वे गाडीला नगरच्या रेल्वेस्टेशनवर हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
नव्याने सुरु झालेल्या नगर बीड रेल्वे मार्गावरील प्रवाशांना आता थेट मुंबईला जाता येणार आहे. यासाठी नगरमधून जाणाऱ्या रेल्वेला नगर बीड गाडीचे डबे जोडण्यात येणार आहे. या गाडीला मंत्री रावसाहेब दानवे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नगर शहरात येत आहेत. त्यांच्या स्वागतार्थ शहरातून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. तसेच दुपारी जिल्ह्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जाहीर मेळावा होणार आहे. दि.१९ रोजी उड्डाणपूलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एका भव्य व दिमाखदार सोहळ्याने होणार आहे. या तिन्ही महत्वाच्या कार्याक्रमचे नियोजन सर्व पदाधिकारी करत आहेत.