संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : रुग्ण हक्काच्या लढ्यासाठी जन आरोग्य समिती अहमदनगर येथे गठीत करण्यात आली आहे.या समितीची रहमत सुलतान हॉल सर्जेपुरा अहमदनगर येथे जन आरोग्य समितीची बैठक झाली. यावेळी तुषार रननवरे, गणेश कराळे ,विनायक गोरखे, सचिन भिंगारदिवे ,युनूस तांबटकर, भैरवनाथ वाकळे, रमेश शेंडाळे, सचिन भस्मे, संध्या मेढे, अनिल रं. भोसले ,नदीर खान उपस्थित होते.
या समितीमध्ये नाशिक येथील प्रमुख वक्ते म्हणून संतोष जाधव सर उपस्थित होते. संतोष जाधव सर हे जन आरोग्य समिती नाशिकचे संस्थापक आहेत.प्रस्तावना संध्या मेढे यांनी केली. यात त्यांनी रुग्णांना होणारा त्रास व खाजगी रुग्णालयातून होणारी आर्थिक लूट याबद्दल सांगत या समितीचे नगरमध्ये फार आवश्यकता आहे हे सांगितले. संतोष जाधव सर यांनी आरोग्य क्षेत्रातील वर्तमान अवस्थेचा थोडक्यात आढावा घेतला. महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायदा 2021 विषयी माहिती दिली. त्यानंतर नाशिक सांगली पुणे चा अनुभव व यशस्वी उदाहरणे देऊन सांगितला. त्यानंतर मान्यवर उपस्थित यामध्ये प्रश्नोत्तरे झाले. आणि सर्वांमध्ये ठरले की बॉम्बे नर्सिंग होऊन कायदा 2021 आणि आरोग्य विषयक सर्व कायद्याच्या अंमलबजावणी करिता आपण कार्य करणे खूप आवश्यक आहे. ही काळाची गरज देखील आहे. म्हणून अहमदनगर येथील समितीला सुद्धा जन आरोग्य समिती अहमदनगर हे नाव देण्यात आले. याचा विस्तार पुढील सहा महिन्यांमध्ये करू तोपर्यंत आज होणारी निवड ही पुढील सहा महिने पर्यंत कायम राहील. समिती पुढील प्रमाणे सात सदस्य असणाऱ्या समितीचे जिल्हा समन्वयक दीपक पाचपुते काम पाहतील .तसेच नदिर खान, संध्या मेढे ,अनिल रंगनाथ भोसले ,कारभारी गरड, सदस्य म्हणून काम पाहतील .
या समितीचा पुढील कृती कार्यक्रम असेल
1) शहर पातळीवर जिल्हाधिकारी, आयुक्त आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद- निवेदन
2) zp ceo and dho यांच्याशी संवाद साधणे आणि निवेदन देणे.
3) IMA तसेच खाजगी दवाखाने मालक संघटने बरोबर संवाद आणि निवेदन देणे.
4) लोकांमध्ये रुग्ण हक्क सनद, दरपत्रक आणि तक्रार निवारण कक्ष संदर्भात जनजागृती कार्यक्रम करणे.
5) जिल्हा समन्वयक गटाशी बोलून समितीची बैठक/कार्यशाळा पुढील तारीख लवकर जाहीर करतील.