रा.काँ. शरदचंद्र पवार पक्ष युवक नगर शहरातर्फे बदलापूर घटनेचा तीव्र निषेध
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : नगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहर जिल्हाध्यक्ष रोहन शेलार यांच्या विशेष पुढाकारातून युवानेते तथा शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर ठिकाणी लहान मुली वर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी जाहीर निषेध करुन अपयशी सत्तेधारी सरकारविरुद्ध नगर माळीवाडा बसस्थानक छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे, शहर जिल्हा सचिव नितीन खंडागळे, सरचिटणीस अतुल शिंदे, आकाश कोरे, अल्फरन कुरेशी, मयूर भिंगारदिवे, विकी पवार, बाबू कुरेशी, नाना घोडके, अल्पसंख्यांक उपशहर जिल्हाध्यक्ष, अजय पाटोळे, काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष गौरव घोरपडे, मनोज गोयल यादी सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.