तनपुरे कुटुंबाच्या पायाखालची वाळू घसरल्याने आमच्यावर आरोप – खा. विखे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहुरी – राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार विद्यमान संचालकांनी खा.डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्या एकाधिकार शाही व मनमानी कारभाराला कंटाळून भाजपा प्रणित विकास मंडळात प्रवेश केला.
राहुरी येथे भारतीय जनता पार्टी व विकास मंडळाच्या कृषि उत्पन्न बाजार समिती संभाव्य उमेदवार व कार्यकर्त्यांची बैठक खा.डॉ.सुजय विखे पाटील व माजी मंत्री जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी बाजार समितीचे विद्यमान संचालक दत्तात्रय खुळे, उपसभापती सौ.शोभा जालिंदर आढाव यांचे पती जालिंदर आढाव, वसंतराव कोळसे, रमेश पवार, माजी संचालक बाबासाहेब पवार यांचे बंधू भगीरथ पवार आदींनी खा.डॉ.सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते तनपुरे यांच्या एकाधिकार शाही व मनमानी कारभाराला कंटाळून भाजपा प्रणित विकास मंडळात प्रवेश केला.
खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, तनपुरे कुटुंबाच्या पायाखालची वाळू आता घसरली असून त्यामुळेच आमच्यावर आरोप सुरू झाले आहेत. कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करून कामाला लागावे आम्ही सक्षम उमेदवार रिंगणात उतरून सक्षम पॅनल देणार असल्याचे ही खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, यावेळी राहुरी बाजार समिती ही भाजपा प्रणित विकास मंडळाच्या ताब्यात येणारच आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळेल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. आपण पूर्ण ताकदीनिशी बाजार समितीच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की, डॉ. तनपुरे कारखाना ज्यांनी बंद पाडला. स्वतः चा खाजगी कारखाना काढला व सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न केला त्यांना आता ज्यांनी कारखाना सुरू केला ते बाहेरचे वाटू लागले आहेत. आमच्या काही संचालकांच्या १५० कोटींच्या ठेवी असलेल्या संस्था आहेत त्यांनी कधी सांगितले नाही. मात्र बाजार समितीमध्ये व्यापारी हित जोपासण्याचे काम करणारे संस्थेच्या प्रगतीचा कांगावा करत आहेत.
यावेळी डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेशराव करपे, उत्तरामराव म्हसे, विक्रम तांबे, राजेंद्र साबळे, सुरेशराव बानकर, अमोल भनगडे, शामराव निमसे, रविंद्र म्हसे, विश्वास कडू, अशोक उंडे, शरद पेरणे, उत्तम आढाव, भिमराज हारदे, विजय बानकर, उत्तमराव खुळे, साहेबराव तोडमल, विराज धसाळ, आशिष बिडगर, बबन कोळसे, प्रभाकर हरिश्चंद्र, किरण दिघे, अरुण पवार, सुनील देशमुख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.