राहुरीत वकील दांम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन खून : आरोपी अटक ; एलसीबीची महत्त्वपूर्ण कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (Vodio)
अहमदनगर : राहुरी येथील वकील दांम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन खून करणा-या गुन्हेगारांना २४ तासांच्या आत पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी ‘अहमदनगर एलसीबी’ ने केली आहे. किरण दुशींग याच्या साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (वय २३, रा. येवले आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर), शुभम संजीत महाडिक (वय २५, रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी, ता. राहुरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (वय २०, रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम, श्रीरामपूर डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे पोउपनि तुषार धाकराव तसेच पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, अमृत आढाव, सागर ससाणे, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, भिमराज खर्से, प्रमोद जाधव, रणजित जाधव, संतोष खैरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे या सर्वांचा सहभाग असणा-या तीन वेगवेगळे पथकांनी ही महत्वपूर्ण कामगिरी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गुरुवार ( दि.२५ जानेवारी २०२४) ला ॲड राजाराम जयवंत आढाव (वय ५२), ॲड मनिषा राजाराम आढाव (वय ४२, दोघे रा. मानोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) हे वकील दांम्पत्य त्यांच्या राहत्या घरुन राहुरी न्यायालयात गेले होते. परंतु दुपारनंतर त्यांचे नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नसल्या कारणाने लता राजेश शिंदे (वय ३८, रा. बाजारपेठ, पानसरे गल्ली, संगमनेर) यांनी दिलेल्या खबरीवरुन राहुरी पोलीस ठाण्यात मनुष्य मिसींग रजि. नंबर २६/२०२४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.
राहुरी परिसरामधून वकील दांम्पत्य मिसींग झाल्याची घटना घडल्याने एसपी राकेश ओला यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एलसीबीचे दिनेश आहेर यांना आढाव वकील दांम्पत्याचा शोध घेणेबाबत सूचना दिल्या होत्या. यानंतर आदेशान्वये पोनि श्री. आहेर यांनी एलसीबीचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सहभाग असणा-या विविध एलसीबी टिम’ला वकील दांम्पत्याचा शोध घेणेकामी रवाना केले. एलसीबी टिम ही मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरी न्यायालय परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व वकील दांम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकिलपत्र आहेत. याबाबत माहिती घेत असतांना राहुरी न्यायालय परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयीत कार दिवसा व रात्रीचे वेळी गेलेली असल्याचे दिसून आली. या कारचा शोध घेत असतांना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशींग (रा. राहुरी) याच्या वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकील दांम्पत्याकडे असल्याचे व सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसून आलेली संशयीत कार किरण दुशींग वापरत असल्याची माहिती मिळाली.
एलसीबी टिम’ने किरण दुशींग याची मागील गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे पूर्ण नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (वय ३२, रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे सखोल व बारकाईने तपास करता त्याने मागील काही दिवसापासून त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर), शुभम संजीत महाडिक (रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर),👉 बबन सुनिल मोरे (रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांच्यासह कट करुन वकील दांम्पत्याला न्यायालयातील केसच्या कामकाजाकरीता बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना किरण दुशींग याने स्वत:चे गाडीत बसवून वकील दांम्पत्यांचे घरी घेऊन जाऊन त्यांचे घरामध्ये दोघांचे हात पाय बांधून ठेवून ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. परंतु वकील दांम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्या घरामध्ये ५ ते ६ तास त्यांचा छळ केला. त्यानंतर त्यांना वकील दाम्पत्याच्या गाडीमध्ये बसवून त्यांना मानोरी गावाचे बाहेर घेऊन जाऊन रात्रीच्या सुमारास दोघांचे डोक्यामध्ये प्लॅस्टीक पिशव्या घालून त्यांचा श्वास गुदमरुन खून केल्याबाबत व त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या विहीरीमध्ये दगड बांधून टाकून दिले. त्यानंतर वकील दांम्पत्याची गाडी राहुरी न्यायालय परिसरामध्ये लावली असल्याचे सांगितले. आरोपीने सांगितलेल्या हकीगतीवरुन खात्री करता उंबरे गावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या विहीरीमध्ये वकील दांम्पत्याचे मृतदेह आढळून आले आहेत.
त्यादरम्यान घडलेल्या घटनेबाबत माहिती मिळाल्याने तक्रारदार लता राजेश शिंदे (वय ३८, रा. बाजारपेठ, पानसरे गल्ली, संगमनेर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०२,३६३,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी किरण दुशींग याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (वय २३, रा. येवले आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर), शुभम संजीत महाडिक (वय २५, रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी, ता. राहुरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (वय २०, रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांना एलसीबी टिम’ने वेगवेगळ्या ठिकाणावरुन ताब्यात घेतले. त्यांना पुढील तपासकामी राहुरी पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास राहुरी पोलीस हे करीत आहेत.
किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्याविरुध्द यापूर्वी खून, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.