👉शहीद भारतीय लष्कर प्रमुख व त्यांच्या सहका-यांना महिला गटांनी वाहली श्रध्दांजली
👉संविधान उद्देशिकाचे वाचन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहुरी- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्र राहुरी व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे समतादूत प्रकल्पतर्फे संविधान कामानिमित्त महिला कायद्याविषयी व आर्थिक साक्षरता प्रशिक्षणचे राहुरी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी पोलीस स्टेशनचे सपोनि सुर्यवंशी, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गर्जे, ब्राम्हणी येथील उद्योजक प्रसाद बानकर, माविमचे राहुरी तालुका व्यवस्थापक महेश अबुज, बार्टीचे राहुरी तालुका समतादूत पिरजादे एजाज उपस्थित होते. कार्यक्रमची सुरूवात हेलिकॉप्टर दृघटनेत भारतीय लष्कर प्रमुख व त्यांच्या सहका-यांचे निधन झाले. या सर्व भारतीय शहीद प्रमुखांना उपस्थित मान्यवरांनी व महिला गटांनी श्रध्दांजली दिली. संविधान दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात संविधान उद्देशिकाचे वाचन ही या प्रसंगी करण्यात आले. महिलांना कायद्याची माहिती व्हावी व महिलांचे गुन्हेगारापासून संरक्षण तसेच महिलांचे कौटुंबिक हिंसाचार,जेन्डर विषयी सपोनि सुर्यवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान उपस्थित महिलांसोबत कायद्याबाबत चर्चा करण्यात आली. माविमतर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रमाविषयी माविम जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गर्जे यांनी माहिती दिली. महिलांना आर्थिक व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी प्रसाद बानकर यांच्या वतीने महिलांना आर्थिक व्यवहार पुस्तिका भेट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीरामपूर माविम व्यवस्थापक सौ. देशमुख मॅडम, माविम चे राहुरी क्लस्टर काॅर्डिनेटर सौ. योगिता चुंबलकर, सौ. कल्याणी पवळे , उमेश खरात यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत पिरजादे एजाज यांनी केले, तर आभार व्यवस्थापक महेश अबुज यांनी मानले.