राहात्यात रविवारी कर्मचा-यांच्या बँकांची सहकार परिषद

ना. राधाकृष्ण विखे, ना. अतुल सावे, श्री. हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती. शताब्दी निमित्त बँकेच्या सर्व माजी पदाधिकाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
अहमदनगर
राज्यातील कर्मचाऱ्याच्या बँकांची सहकार परिषद येत्या रविवारी (दि २३ एप्रिल) राहाता येथे सकाळी १०वा. आयोजित केली आहे. या परिषदेला अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा, राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, व्याख्याते गणेश शिंदे, बापूसाहेब तांबे, दत्ता पाटील कुलट, राजकुमार साळवे, विद्याताई आढाव, अंजली मुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बँकांच्या वसुलीबाबत राज्यात एकच धोरण असावे, कर्मचाऱ्यांचे पगार शिक्षक बँकेमध्ये व्हावे, जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांच्या वसुलीची हमी मिळावी, तसेच कर्मचाऱ्यांचे बँकांचे नवीन शाखेबाबत निकष बदलावे आदी विषयावर या परिषदेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. राज्यातील इतर सहकारी बँका व कर्मचाऱ्यांच्या बँका यामध्ये फरक असून कर्मचाऱ्यांच्या बँकांचे प्रश्न वेगळे आहे, हे सरकार पुढे मांडण्यासाठी ही सहकार परिषद आयोजित केली आहे, अशी माहिती शिक्षक बँकेचे चेअरमन संदीप मोटे व व्हाईस चेअरमन कैलास सारोक्ते यांनी दिली.
या सहकार परिषदेमध्येच अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त बँकेच्या कारभारामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं असे सर्व माजी चेअरमन, माजी संचालक, शिक्षक नेते व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे कै. चिंतामण वाळिंबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९ सप्टेंबर १९१९ रोजी या बँकेचे रोपट लावलं. आज या बँकेचा वटवृक्ष झाला असून बँकेच्या तेराशे कोटींच्या पुढे ठेवी आहेत. साडेनऊशे कोटी रुपये कर्ज वितरण आहे तर ११००० सभासद आहेत. बँकेची वार्षिक उलाढाल जवळपास तीन हजार कोटी रुपयांची आहे. बँकेमार्फत जवळपास ३५ लाख कर्ज तात्काळ मंजूर केले जाते. यात जामीन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, वैद्यकीय कर्ज, प्रासंगिक कर्ज अशा कर्जाचा समावेश आहे. दुर्दैवाने एखादा सभासद मयत झाला तर त्याचे सर्व ३५ लाखांचे कर्ज माफ करून त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा म्हणून पंधरा लाखांची मदत देणारी राज्यातील ही एकमेव बँक आहे. राज्यात ज्या सहकारी बँका आहेत, त्यामध्ये शंभर वर्षांची परंपरा असणारी आपल्या जिल्ह्यातील ही अग्रगण्य बँक आहे. या बँकेने आजपर्यंत हजारो शिक्षकांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य दिले आहे. शिक्षकांच्या सामाजिक, आर्थिक उन्नती मध्ये या बँकेचे योगदान खूप मोलाचे आहे. म्हणूनच ही खऱ्या अर्थाने शिक्षकांची “कामधेनु” आहे. या बँकेत भा. दा. पाटील, ग.रा. पोखरकर, चं. भि. धनवटे, पा. यं. फलके, कि. बा. म्हस्के, स. शी. सोंडकर, दा.र सुतार, द. मा. ठुबे, विष्णू खांदवे, सो.सा. गायकवाड घों.बा.कलगुंडे, रघुनाथ खळदकर यांचे पासून तर श्री. बापूसाहेब तांबे राजकुमार साळवे आदींनी या बँकेचे नेतृत्व करीत या बँकेला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले.
शताब्दी वर्षानिमित्त समारोपाच्या कार्यक्रमात या सर्व धुरीणांचा सत्कार करण्याचे ठरले होते. परंतु कोरोणाच्या महामारीने सर्व जगच थांबल्याने हा कार्यक्रम होऊ शकला नाही.
बँकेच्या शताब्दी निमित्त जिल्ह्यातील शिक्षक भगिनींचे योगदान मोलाचे असल्याने त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात १०० शिक्षीकांचा “सावित्रीच्या लेकी” पुरस्काराने सन्मान केला. शताब्दी समारंभाचा शुभारंभ महाराष्ट्राचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत झाला. शताब्दी समारंभ निमित्त सभासदांना घड्याळ भेट म्हणून दिले. शताब्दी वर्षानिमित्त बँकेने सभासदांना कायम ठेवीवर व शेअर्सवर विक्रम व्याज देऊन कर्जाचा व्याजदर ८% पर्यंत खाली आणला. ठेव व कर्जाच्या व्याजाचे प्रमाण सव्वा टक्केच्या आसपास ठेवून बँकेने आदर्शवत काटकसरीचा व सभासद हिताचा कारभार केला आहे, असे श्री. संदीप मोटे यांनी सांगितले.
या सहकार परिषदेला जिल्ह्यातील सर्व सभासद बंधू भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन बापूसाहेब तांबे, राजकुमार साळवे, विद्याताई आढाव, दत्ता पाटील कुलट, विठ्ठलराव फुंदे, गोकुळ कळमकर, मनोज सोनवणे, साहेबराव अनाप, आबा दळवी, संतोष दुसंगे, राजू राहणे, किसनराव खेमनर, राजेंद्र सदगीर, अंजलीताई मुळे, सलीमखान पठाण, शरद भाऊ सुद्रिक, अर्जुन शिरसाट, आर. टी. साबळे, नारायण पिसे, सुयोग पवार, बाबासाहेब खरात शिक्षक बँकेचे संचालक श्री. अण्णासाहेब आभाळे, सरस्वती घुले, भाऊराव राहिंज, शशिकांत जेजुरकर, योगेश वाघमारे, बाळासाहेब सरोदे, रामेश्वर चोपडे, रमेश गोरे, गोरक्षनाथ विटनोर, महेंद्र भनभणे, निर्गुणा बांगर, सूर्यकांत काळे, कारभारी बावर, बाळासाहेब तापकीर, संतोष राऊत, माणिक कदम, मिनाज शेख, ज्ञानेश्वर शिरसाट तसेच कल्याण लवांडे, बाळासाहेब कदम, शरद वांडेकर, दिनेश खोसे, राजेंद्र विधाते, मुकेश गडदे, विलास गवळी, संतोष मगर आदांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!