राष्ट्रीय समाज पक्ष केंद्रीय व राज्य कार्यकारिणीचे शेवगाव पाथर्डी विधानसभा लढण्यावर शिक्कामोर्तब

राष्ट्रीय समाज पक्ष केंद्रीय व राज्य कार्यकारिणीचे शेवगाव पाथर्डी विधानसभा लढण्यावर शिक्कामोर्तब

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : राष्ट्रीय समाज पक्ष शेवगाव- पाथर्डी विधानसभा आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक शनिवारी शेवगाव येथे राष्ट्रीय समाज पक्ष शेवगाव पाथर्डी विधानसभा निरीक्षक डॉ. प्रल्हाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.


बैठकीत पक्ष निरीक्षक डॉ प्रल्हाद पाटील यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढण्याचे निर्देश दिले. गेल्या दहा वर्षांमध्ये पक्षाला मित्रपक्षांने सतत डावलण्याचे काम केले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांना सहकार्य करून सत्ता आपणा भोवती फिरवायची कशी याचे नियोजन करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला सुसंस्कृत उच्च विचारसरणी असलेला उमेदवार द्यायचा आहे. जो सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडून त्याला न्याय मिळवून देईल. पक्षामध्ये निवडणूक लढण्यासाठी बरेच जण इच्छुक आहेत. इतर मातब्बर सुद्धा राष्ट्र नायक महादेवजी जानकर यांच्या संपर्कात आहेत. पक्ष संघटनेकडून जो उमेदवार दिला जाईल, त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष अतोनात प्रयत्न करेल. येणाऱ्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कार्यकर्त्यांनी आपलं संघटन कौशल्य वापरून समाज हिताबद्दल प्रबोधन करून राष्ट्रीय समाज पक्ष आपल्याला योग्य पर्याय उपलब्ध करून देत आहे आपण त्या पर्यायाच सोनं करावं, असे प्रतिपादन मा श्री शहाजी कोरडकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष यांनी केले.
शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ हा नात्यागोत्याच्या राजकारणांनी व घराणेशाहींनी वैतागलेला आहे. सर्वसामान्य लोकांना त्यांचे सुखदुःख जाणून घेणारा व त्यांचा आवाज उठवणारा उमेदवार हवा आहे.‌ या मतदारसंघांमध्ये सत्ताधारी व विरोधक मिळून मिसळून राजकारण करत आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष एक उच्चविचारसरणी असलेला सर्वसामान्य माणूस जनतेचा सेवक होण्यासाठी देणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष आत्माराम कुंडकर यांनी केले. आगामी निवडणुकीमध्ये योग्य रणनीतीचा वापर करून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्षाचा विजयी उमेदवार करणार असा निर्धार
शेवगाव तालुकाध्यक्ष गोवर्धन शेळके यांनी केला.
राष्ट्रीय समाज पक्ष शेवगाव पाथर्डी विधानसभा निरीक्षक डाॅ. प्रल्हाद पाटील,
अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष शहाजी कोरडकर, आत्माराम कुंडकर, पाथर्डी-शेवगाव तालुकाध्यक्ष अंकुश जी बोके, गोवर्धन शेळके, शेवगाव पाथर्डी विधानसभा अध्यक्ष पोपटराव राशिनकर,
शेवगाव शहराध्यक्ष सुनील शिंदे, शेवगाव युवक तालुका अध्यक्ष अजित माळवदे, शेवगाव तालुका उपाध्यक्ष ज्योतीराम घोडखिंडे, अहमदनगर दक्षिण
जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र नजन, प्रताप घाडगे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी
शेवगाव शहर उपाध्यक्ष पठाण वलिमहंमद समशेर खान, कानिफनाथ पोपट कावले, युवक तालुका उपाध्यक्ष गणेश सुखदेव नागरे, तालुका सरचिटणीस वैष्णव संभाजी अजबे, युवक तालुका सरचिटणीस बबन गोविंद वडघणे, तालुका संघटक चैतन्य चंद्रकांत देवढे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष निखिल बडे, गणेश बडे, सोमनाथ दराडे, शिवाजी निचळ आदी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.
यावेळी बाजीराव लेंडाळ, दत्ता वनवे, खांबट पाटील, नवनाथ ढाकणे, देविदास शिरसाठ, नवनाथ उगले सुनील उगले, संजय गवळी, प्रदीप पटेकर, गणेश जाधव, भास्कर कोल्हे, नानासाहेब डोळे, अमोल मांडवे, शेख वसीम, पठाण रोहीम, हर्षल शिंदे, राहुल काळे,आकाश माळवदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!