निलेश ढाकणे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : पैठण ते पंढरपूर ही तिर्थस्थळ जोडणारा ७५२-ई हा राष्ट्रीय महामार्ग प्रगतीपथावर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मुंगी, हातगांव, बोधेगाव, लाडजळगाव, शेकटे या गावातून हा महामार्ग जात आहे. या भागातील महामार्ग लगतचा शेतकरी मात्र ठेकेदारांच्या हुकूमशाही वागणुकीमुळे जेरीस आला आहे.
2018 पासून या रसत्याचे काम सुरू आहे, काम सुरू होण्यापूर्वी लगतच्या शेतकर् याच्या जमीनीचे मोजमाप, लगतच्या फळ झाडाचे, राहत्या घराचे पंचनामे होऊन त्यांना योग्य तो मोबदला मिळणे अपेक्षित होते. परंतु ठेकेदाराने शासकीय कुठल्याही कार्यवाही शिवाय ज्या ठिकाणी मोकळे आहे. त्या ठिकाणी काम करुन घेतले, ज्यांनी आक्षेप घेतला, अशा एक एक शेतक-यांना धमकावत, पोलीसांची भिती दाखवून त्याच्या क्षेत्रातील काम करून घेतले. पुढे काही शेतकरी एकत्र आले व विविध सरकारी कार्यालयात निवेदन देत, बोधेगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले.
मग कुठे भुमिअभिलेख मार्फत मोजमाप सुरू झाले, या मोजमापात सुध्दा अक्षम्य चुका आहेत. क्षेत्र कमी जास्त लागले आहेत तसेच अनेक शेतकर् याचे नावच यादीत आलेले नाही,
अनेक शेतक-याचे फळझाडे आहेत. त्याचे मुल्यांकन होऊन रितसर मोबदला देण्याएवजी झाड तोडण्यास विरोध दर्शवणा-या शेतकऱ्यांना ठेकेदारांकडून पोलिस कारवाईची धमकी देण्यात येत आहे.
प्रांत कार्यालयाकडून दुर्लक्ष
अनेक शेतकऱ्यांनी आपली फळझाडे, पाईप लाईन, मोजणी पत्रकात नाव नसल्याबाबत पाथर्डी येथील प्रांत कार्यालयात अर्ज केले आहेत, पण या अर्जावर कसलीही कार्यवाही होताना दिसत नाही.
कामाचा निकृष्ट दर्जा
ज्या ठिकाणी काम सुरू आहे. त्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट स्वरूपाचा असून, ज्या ठिकाणी सिमेंट रस्ता झालेला आहे. त्याला तडे गेले आहेत. त्यामुळे रस्ता किती दिवस टिकेल, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
जुन्या रस्त्यावर अनेक ठिकाणी काटकोनातील वळण होती. ती जशीच्या तशी ठेवण्यात आली आहेत. ९० अंशाची ही वळण महामार्गावर कसी असू शकतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.