संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर -: संत गाडगोबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विभागस्तरावर अहमदनगर जिल्हयातून कर्जत तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायत सरस ठरली आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत थेरगाव ता.कर्जत या ग्रामपंचायतीस विभागस्तरीय व्दितीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे.
संत गाडगोबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन2019-20 अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदशनाखाली अभियानात उत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय समितीने तपासणी केली होती.या तपासणीत ग्राम पंचायत गणेगाव ता. राहुरी प्रथम थेरगाव ता कर्जत व्दितीय व खडकी वाकी ता.राहाता या ग्राम पंचायतीला तृतीय क्रमांकाचे पारीतोषिक मिळाले होते.
या तीन ग्राम पंचायती पैकी जिल्हा स्तरीय तपासणी मध्ये अनुकमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे ग्रामपंचायती ची मा. आयुक्त नाशिक विभाग. नाशिक यांचे विभाग स्तरीय समितीने तपासणी केली.यावेळी समितीमार्फत गावातील शाळा,अंगणवाडी,पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छता विषयक आदी कामांची पहाणी करण्यात आली होती.सदर समितीने प्रदान केलेल्या गुणांच्या आधारे नाशिक विभागीय आयुक्त मा.राधाकृष्ण गमे यांनी नुकताच विभागस्तरीय निकाल जाहीर केलेला असुन यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत थेरगाव ता.कर्जत या ग्रामपंचायतीस नाशिक विभागात व्दितीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे.
ग्रामपंचायतीस मिळालेल्या पुरस्कारामुळे मा. संभाजी लांगोरे मुख्य कार्यकारी अधिकारी व सुरेश शिंदे,प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जिल्हा परीषद यांनी कर्जत पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे सर्व यंत्रणांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक करून थेरगाव ग्रामपंचायतीस राज्य स्तरीय पुरस्कारा कामी योग्य ते मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
थेरगाव ग्रामपंचायतीस मिळालेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.