संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पारनेर – माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे, नंदकुमार झावरे, विजय औटी यांच्या काळात पारनेर तालुक्याची एक वेगळी उंची अस्तित्वात होती. आता मात्र तहसील, पोलीस प्रशासनावर विविध अनधिकृत कामांसाठी दबाव आणला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून इतर पक्षातील कार्यकर्त्यांवर चुकीचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. पारनेर तालुक्यातील दंडकशाही लोकतंत्रासाठी घातक असल्याचे मत विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे टाकळी ढोकेश्वर परिसरातील गावांमधील वयोश्री योजनेतील ६००लाभार्थींना साहित्य वाटप कार्यक्रम खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते.
यावेळी कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, ज्येष्ठ नेते सीताराम खिलारी, सुदेश झावरे, राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, सुभाष दुधाडे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, अश्विनी थोरात, किरण कोकाटे, अरूण ठाणगे, अड. बाबासाहेब खिलारी, सागर मैड, उषा जाधव, किसन धुमाळ, नारायण झावरे, रामचंद्र झावरे, भाऊ सैद, शंकर बर्वे, भगवान वाळुंज, दिलीप उदावंत आदी उपस्थित होते.
डॉ. विखे म्हणाले, योजना मंजुरीचे कोट्यावधीचे आकडे आम्ही माध्यामात वाचतो प्रत्यक्षात येथे काहीच दिसत नाही मी मंजूर केलेले रस्ते पूर्ण झाले. योजना राबविली त्याचे साहित्य आज वाटप करत आहेत. आम्ही कामांच्या जिवावर राजकारण केले दंडकशाहीने नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
सुजित झावरे म्हणाले, खासदार डॉ. विखे यांनी तालुक्याला दिलेला निधी व योजनेंचा येवढ्या मोठ्या प्रमाणात लाभ इथून मागे कधी कोणी दिला नाही वयोवृध्दांच्या अडचणी त्यांनी जाणल्या याचे मनस्वी समाधान वाटते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद झावरे यांनी केले. लाभार्थींना देवकृपा परिवारामार्फत जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
👉तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार
सामान्य माणसाचे कुपन सह इतर कामे ही तहसील कार्यालयामार्फत चालतात मात्र या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. पैसे दिल्याशिवाय कोणतेच कामे होत नाही. प्रशासनावर कोणाचाच दबाव दिसत नाही, असेही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.