संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे नगर तालुका कार्यकारणी पदाधिकारी नियुक्तीपत्र पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी सामजिक न्याय विभागाचे नगर तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, इसळक गावाचे सरपंच संजय गेरंगे पाटील, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष हिंगणगावचे सरपंच आबा पाटील सोनवणे, महिला तालुका अध्यक्षा सुनीताताई धनवटे,तालुका सरचिटणीस रशीदभाई शेख, युवक तालुका अध्यक्ष समीर पटेल , तालुका उपाध्यक्ष सीताराम सकट पाटील, नगर जिल्ह्याचे आदिवासी समाज्याचे अध्यक्ष व नगर तालुक्याचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राम चव्हाण, आदी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिका-यांचे आमदार निलेश लंके यांनी अभिनंदन करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.