राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सेवादल जिल्हाध्यक्षपदी विनोद साळवे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सेवादल जिल्हाध्यक्षपदी नुकतीच विनोद साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केली असून, या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सेवादल विभाग राज्य प्रमुख राजेंद्र लावंधरे आदिंसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
श्री साळवे यांच्या निवडीबद्दल माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, आमदार संग्रामभैया जगताप, आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष उत्तर कपील पवार , शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधातेसर, शहानवाज खान, बाबा शेख, शेखर बोत्रे , चंद्रकांत वाघमारे आदिंसह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.