संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधान केलं त्यानंतर आता रामदेव बाबांनी अशा प्रकारे स्त्रीबाबत अपमानास्पद विधान केले आहेत. या अशा विधानावरून महाराष्ट्राच्या अस्मिता वरती आघात करण्याचे वारंवार प्रकार सुरू आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध करत रामदेव बाबांवर 354 ड या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार तथा जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली. तसेच आमच्यावर दुसरे खोटे गुन्हा दाखल करतात, तसे आता हिंमत दाखवून खरे गुन्हे दाखल करावे. असे त्यांनी म्हटले.
एकीकडे आपण स्त्रीला आदिशक्ती व देवीच्या भूमिकेत मानतो. महाराजांपासून आपण स्त्रीला मोठा स्थान देत आलो. काल शुक्रवारी ठाण्यात रामदेव बाबांनी विधान केले, ते स्त्री जातीचा अपमान आहे. तेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या समोर केले. हे विधान बाबा रामदेव त्यांच्या विकृत मनोवृत्तीचा प्रदर्शन करणारे आहे. फक्त भगवे वस्त्र घातले, योगा केल्यामुळे मानसिक स्वास्थ सुधारू शकते, पण मानसिक दृष्ठ्या बाबारामदेव विकृत आणि मनोरुग्ण आहेत. हे त्यांच्या विधानातून स्पष्ट झाले.
रामदेवबाबावर फौजदारी कारवाई करावी : ॲड.सौ.शारदाताई लगड
अहमदनगर:-रामदेव बाबा यांनी महिलांच्या राहणीमानाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याचा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ शारदाताई लगड यांनी निषेध व्यक्त करुन या बाबाच्या विरुद्ध पोलीसांनी फौजदारी कारवाई करावी.
वेगवेगळ्या व्यक्तिंकडून आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले आहे योगविद्येमधील एवढया मोठया नावाजलेल्या योगपुरुषाकडुन महीलांच्या राहणीमानाबदल आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्य अपेक्षित नव्हते.कोणी कितीही मोठे असले तरी चुकीचे वागणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.रामदेव बाबांनी तमाम महीला भगीनींचा अपमान केला आहे.तेव्हां रामदेव बाबा यांचे विरुद्ध पोलीसांनी फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या उपाध्यक्षा ॲड.शारदाताई लगड यांनी राज्याचे ग्रुहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.