रामकथा बंधूभावाचे प्रतीक – रामराव ढोक महाराज
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी- रामचरित्र मानस या ग्रंथात मानवी जीवनाच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर असून रामकथा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून ते जीवनाचे सार आहे.बंधुभाव कसा वाढवावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रामकथा आहे असे प्रतिपादन रामायनाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्ताने शहरातील वीर सावरकर मैदान येथे ढोक महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून रामकथेला काल सायंकाळी प्रारंभ झाला. यापूर्वी शहरातून कलश मिरवणूक काढण्यात आली.
ढोक महाराज म्हणाले, प्रभू श्रीरामांचे जीवन आदर्शल्यास मनुष्याला कोणतीही अडचण येणार नाही तर आपण संसारिक,सामाजिक या सर्व घटकांच्या बाबतीत रामकथेत जीवन कसे जगले पाहिजे याचे उत्तर आहे.त्याच धर्तीवर माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी राजकारणात असूनही धुतल्या तांदळासारखे आपले राजकीय जीवन व्यतीत केले.त्यामुळेच त्यांचे नाव आजही अजरामर आहे.
राम कथा बंधुभाव,वात्सल्य,सेवा व कर्म या सर्वांचा आदर्श देणारी कथा असून आजच्या समाजामध्ये vitushataa निर्माण होते आहे ती संपवण्यासाठी राम चरित्र मानस हा ग्रंथ अतिशय उपयुक्त ठरणारा असून, समाजात समतोल राखण्यासाठी एखाद्या प्रदेशाचा राजा कशा पद्धतीने राज्यकारभार चालऊ शकतो याचे विस्तृत विवरण म्हणजे रामकथा आहे. प्रभू श्रीरामांचे चरित्र या कथेद्वारे आज तुमच्या आमच्या पुढे मांडण्यात आलेली असून त्याचे आचरण आपण सर्वांनी केले पाहिजे,तरच खऱ्या अर्थाने रामराज्य या देशात प्रस्थापित होण्यास मदत होईल.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्रतापराव ढाकणे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे,खासदार निलेश लंके,दादा महाराज नगरकर,केदारेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे,युवक नेते सिद्धेश ढाकणे,संदीप बाहेती,प्रणाली ढाकणे, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे,ज्येष्ठ व्यापारी रवी पाथरकर यांच्यासह अनेक मान्यवरांचे हस्ते राम कथेचा पूजाअर्चा करून प्रारंभ करण्यात आला.