राज्यस्तरीय गोळा फेक स्पर्धेत ढाकणे पॉलिटेक्निकचा विद्यार्थी शुभम बडे प्रथम

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव –
तालुक्यातील राक्षी येथील के.सौ.सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज, शेवगाव या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तृतीय वर्ष मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी शुभम बडे ह्याने इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस् असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय गोळा फेक स्पर्धेत ९.८१ मीटर थ्रो-सह प्रथम आला असल्याची माहिती संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रा.श्रीकांत ढाकणे यांनी दिली आहे. यापूर्वी श्रीगोंदा येथे झालेल्या विभागीय स्पर्धेतही शुभम प्रथम आला होता.

शुभम हा वडगांव ता.पाथर्डी या गावच्या शेतकरी कुटूंबातील मुलगा असून त्याच्या या यशाबद्दल वडगांव सह परिसरातून अभिनंदन केले जात आहे.
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत असलेल्या ढाकणे पॉलिटेक्निकमध्ये दैनंदिन पाठयक्रम बरोबरच विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना खेळासाठी भव्य क्रिडांगण उपलब्ध असून यावर फुटबॉल, क्रिकेट, वॉलिबॉल, कबड्डी, खो खो, अथेलेटिक असे विविध खेळ सुविधा दिल्या जातात. कॉलेजचे क्रिडा समन्वयक प्रा. विश्वास घुटे तसेच सह समन्वयक मयूर पुरनाळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. यापूर्वीही संस्थेचे बरेच विद्यार्थी पोलीस भरती, सैन्य भरती, शासकीय सेवा, विविध नामांकित कंपन्यांमध्ये यशस्वी झाले आहेत. अनेकविध सोयी-सुविधांनी संस्थेने अल्पावधीतच जनमानसात मानाचे स्थान पटकाविले आहे. याचीच दखल घेत संस्थेस तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
संस्थेच्यावतीने शुभम बडे याचा प्राचार्य डॉ.आर.एच. अत्तार यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या संस्थेचे अध्यक्ष मा एकनाथरावजी ढाकणे, सचिव जया राहाणे मॅडम, विश्वस्त ऋषिकेश ढाकणे, संगणक विभाग प्रमुख प्रा महेश मरकड, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा सचिन म्हस्के, स्थापत्य विभागप्रमुख प्रा इर्शाद पठाण, प्रा औताडे सर यांनी विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे
✍पत्रकार सोमराज बडे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!