राजमाता जिजाऊ सहकार पॅनेलच्या कपबशी चिन्हावर मतदान करुन मराठा पतसंस्थेच्या उत्कर्षात सामील व्हा. : संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुक सध्या सुरु असून गेली १ महिन्यापासून ही प्रक्रिया सुरु आहे. मात्र या कालावधीत पतसंस्थेच्या उत्कर्षाबदद्ल बोलण्या ऐवजी काहीजन परिवर्तनाच्या नावाखाली संस्थेला बदनाम करत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे. २३ वर्षापुर्वी सुरु केलेल्या या संस्थेने ३० कोटी ठेविंचा टप्पा ओलांडला आहे. नफाही चांगला होत असून नुकतेच नव्याने दोन नविन शाखा सुरु केल्या आहेत. संस्थेत १ रुपयाचाही गैरव्यवहार नसून संस्थेचे कामकाज अत्यंत पारदर्शक आहे. सभासदांच्या ठेविदारांच्या व कर्जदारांच्या हिताचा विचार करुन अनेक तरुणांना रोजगारासाठी सहकार्य केलेले असून वसुलिचे प्रमाणही अत्यंत चांगले असुन पाथर्डी, संगमनेर, भिंगार, शेवगाव या शाखांचा एनपीए शुन्य आहे.

जे आज २३ वर्षात ३० कोटींच्या ठेवी हे लज्जास्पद आहे बोलतात ते संस्थेला व स्वत:ला बदनाम करत आहेत कारण या २३ पैकी २० वर्षात ते संस्थेत संचालक, पदाधिकारी होते. आज बेताल आरोप करतात मात्र आज संस्थेत असलेल्या ३० कोटी ठेवी पैकी यांचा १ छदामही नाही किंवा यांनी ठेविदारांना ठेवी ठेवण्यासाठी प्रयत्न ही केले नाहीत हि वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी सहकार विभाग महाराष्ट्र राज्य यांनी मॉडेल बायलॉज (आदर्श उपविधी) ९७ वी घटना दुरुस्ती नुसार सर्वच पतसंस्था, सहकारी संस्था बँकासाठी लागू केले यामध्ये अत्यंत चांगल्या तरतुदी असून सहकारी संस्थेचा कारभार पारदर्शक राहील त्यामुळे आपल्या संस्थेने हे उपविधी स्विकारले. यामध्ये मानदसचिव हे पदच नाही मात्र तरीही या पदाच्या नियुक्तीचा आग्रह धरण्यात आला त्यासाठी काही पत्र व्यवहार करण्यात आला की ज्या पत्रव्यवहारातील एका पत्रात जिल्हा उपनिबंधक नमुद करतात की मानद सचिव पद फसवून घेतले आहे. अस सगळे असल्याने सदर पद नियुक्ती बाबत संस्थेत मंथन झाले व नाममात्र म्हणुन नियुक्ती करु असा विचार पुढे आला मात्र या परिवर्तन वाल्यांना अधिकार हवे होते ते नाकारल्याने या लोकांनी राजीनामे दिले. संस्था अल्पमतात नसताना पत्रकारासोबत संगनमत करत संस्था त्या पत्रकाराच्या दावनीला बांधण्याच्या आणाभाका घेत संस्थेवर प्रशासक आणला. सदर पत्रकाराने संस्थेला बदनाम केले. राजकीय दबाव वापरत प्रशासक नियुक्त करुन घेतला. ज्या दिवशी प्रशासक आले त्यावेळी त्या पत्रकाराने व या परिवर्तन वाल्यांनी प्रशासका सोबत फोटोग्राफर, बातमीदार पाठवून संस्थेला त्रास दिला सलग ८ ते १५ दिवस त्या पत्रकाराने संस्थेबद्दल लेखनी चालवत मोठे मोठे रकाने छापले आज त्या पत्रकाराची काय अवस्था झाली हे आपण सर्वजण जाणून आहोत.. पुढे संस्थेचे प्रशासक नियमानुसार हटवले व संस्थेचा कारभार संचालक मंडळाकडे आला त्यावेळी अवघ्या १७ कोटींच्या ठेवी होत्या त्यानंतर इंजि. विजयकुमार ठुबे यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या दिड वर्षात संस्थेने ३० कोटी ठेवींचा टप्पा ओलांडला संस्थेत कदीही एकाधिकारशाही कोणीही केली नाही. कोण कोठे राहातो यापेक्षा संघटनेसाठी, संस्थेसाठी किती धडपडतो हे महत्त्वाच आहे. आज इंजि. विजयकुमार दुबे हे अहमदनगरच नव्हे महाराष्ट्रात मराठा सेवा संघाच्या चळवळीत लोकप्रिय आहेत. त्यांनी एकाधिकारशाही केली असती तर ते लोकप्रिय असते का ?
संस्था निवणुक बिनविरोध व्हावी हि इच्छा नक्की होती मात्र जे थकबाकीदार आहेत त्यांना संचालक म्हणून घेणे नैतिकतेच्या दृष्टीने योग्य नव्हते व यांचा अटहास होता त्यांनाच घ्या त्यामुळे या थकबाकीदारांनीच हि निवडणुक लादलीय हे सत्य आहे. यांचे एक समर्थक सेवा संघाचे माजी पदाधिकारी संस्थेचे माजी संचालक, पदाधिकारी यांनी पुतण्या कर्मचारी म्हणून घेण्याचा अटहास धरला तो पुतण्या घेतला तर त्याने संस्थेत १७ लाख रुपयांचा गैरव्यवहार केला आज न्यायालयाने त्याचेकडून रक्कम वसुल करण्याचा आदेश तर दिलाच शिवाय त्या बोडखे कर्मचा-यावर पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. व त्यावेळी संस्था अडचणीत येवू नये यास्तव इंजि विजयकुमार ठुबे यांनी १२ लाख कर्ज स्वतःच्या नावे काढून भरले व संस्था टिकवली विशेष म्हणजे हा प्रकार झाला त्यावेळी इंजि. विजयकुमार ठुबे यांना या लोकांनी बाजुला सारले होते व संस्थेवर हे परिर्वन वाले पदाधिकारी होते मात्र ठुबे यांनी संस्थेसाठी व मराठा सेवा संघासाठी व सभासदाप्रती असलेली बांधीलकी जपत हे पैसे भरले.
गेल्या एक महिन्यापासून पहातोय परिवर्तनाच्या नावाखाली अत्यंत खालच्या पातळीवर जाउन टिका टिपनी करतायेत, एकाच व्यक्ती बदद्ल बोलतायेत पण इंजि. ठुबे हे प्रामाणीकपणे व पारदर्शक पणे संस्थेच्या हितासाठी व उत्कर्षासाठी प्रयत्नशिल आहेत त्यामुळे त्यांना व राजमाता जिजाउ सहकार पॅनेलच्या उमेदवार, समर्थक, मार्गदर्शकांनी कोणावरही कसलिही टिका टिपनी न करता संस्थेच्या उत्कर्षाची व भरभराटीची भुमिका सभासदां समोर मांडली असून आजवर काय केले हे सांगत सभासदांना मतदान मागत आहेत. याउलट या मंडळींनी मात्र परिवर्तनाच्या नावाखाली संस्थेच्या उत्कर्ष व भरभराटीकडे दुर्लक्ष करत फक्त व्यक्तीगत टिका टिपनी सुरु केलीय कुठेही जनाधार नसलेली हि मंडळी असून यांच्या परिवर्तन पॅनेल मध्ये जे उमेदवार आहेत त्यातील ४-५ उमेदवारांचा मराठा सेवा संघाशी दुरान्वये संबंध नाही कधीही त्यांनी मराठा सेवा संघात काम केले नाही उलट मराठा सेवा संघाच्या सर्वोच्च नेतृत्वाबददल अपशब्द वापरनारे यात असल्याने हयांना नेमक कसल परिवर्तन हवय हा प्रश्न पडतो.
या सर्व पार्श्वभुमीवर आम्ही आपणास नम्र आवाहन करतो की, मराठा पतसंस्थेच्या निवडणुकीत राजमाता जिजाउ सहकार पॅनेलच्या उमेदवारांना आपले बहुमुल्य मत दया, त्यांच्या कपबशी चिन्हावर फुलीचा शिक्का मारुन विजयी करा. पतसंस्था वाचवा, संस्थेच्या भरभराटीसाठी व उत्कर्षासाठी आपण रविवार दि. २३ एप्रिल २०२३ रोजी मतदान केंद्रावर जाउन मतदान करा. संस्था व सहकार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!