संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.विजयकुमार ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली उभा असलेल्या राजमाता जिजाऊ पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. ही निवडणुक बिनविरोध झाली असती मात्र काही हेकेखोर माजी संचालकांमुळे या निवडणुकीला सामोरे जावे लागले असून यामध्ये सभासदांनी दाखलेला विश्वासाला आम्ही तडा जावून देणार नाही असे आश्वासन इंजि.ठुबे यांनी दिले.

अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुक नुकतीच पार पडली. गेल्या महिन्याभरात सुरु असलेली ही निवडणुक आरोप प्रतिआरोपांनी गाजली. या निवडणुकीत एकूण 34 उमेदवारांनी आपले नशिब आजमावले. यामध्ये राजमाता जिजाऊ पॅनेलचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीत सर्व सभासदांनी दाखवलेला विश्वासाबद्दल इंजि.ठुबे यांनी सर्वांचे आभार मानले आहे. सर्वांना बरोबर घेऊन संस्थेची प्रगतीकडे वाटचाल सुरच राहिल यात शंका नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी बोलताना सांगितले की, जिल्हा निबंधकांनी अपिलामध्ये दिलेला निर्णय हा संशयास्पद आहे. या निर्णयाची चौकशी येत्या एक महिन्यात करण्याबाबत आम्ही सहकार मंत्र्यांना आणि पालमंत्र्याना भेटणार आहोत. याव त्यांनी कठोर कारवाई केली नाही तर कठोर स्वरुपाचा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परकाळे यांनी दिला आहे.
पॅनलच्या विजयानंतर विजयी उमेदवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. ढोल ताशांच्या गजरात मराठा सेवा संघाचा विजय असो, तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकळे, दत्ता साठे, विजय म्हस्के, पप्पू गिते, गणेश वाघस्कर, नवनाथ मोरे, अच्युत गाडे, नितीन मरकड, गोवर्धन पांडूळे, अभिजीत दरेकर, दादा पांडूळे आदी उपस्थित होते.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
सर्वसाधारण प्रतिनिधी
विजयकुमार गोविंदराव ठुबे-1491
ज्ञानदेव दत्तात्रय पांडुळे- 1487
ज्ञानेश्वर भाऊसाहेब अनभुले – 1449
द्वारकाधीश उत्तमराव राजेभोसले-1382
सतिष शंकरराव इंगळे- 1416
द्वारकाधीश उत्तमराव राजेभोसले -1382
बाळकृष्ण मारुती काळे – 1419
लक्ष्मण भानुदास सोनाळे – 1375
बाळासाहेब दशरथ सोनाळे – 1373
काशिनाथ कुंडलिक डोंगरे – 1361
संभाजी मोहीनीराज मते – 1360
किसन सखाराम पायमोडे – 1348
यशवंत जयवंतराव शिंदे – 1339
महिला राखीव
ठुबे कल्पना शरद – 1423
शितोळे राजश्री रविंद्र – 1412
इतर मागास
किशोर मोहनराव मरकड – 1501
वि.जा.भ.ज.वि.मा.प्र.
राजेश दत्तात्रय कावरे – 1512