बाराबाभळी येथे दलित महासंघ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – समाजामध्ये आजही विविध प्रश्न प्रलंबित आहेत. राजकीय पक्ष सत्तेसाठी आजही जातीपातीचे राजकारण करत आहेत निवडणुका आल्या की,फक्त आश्वासनांचा पाऊस राजकीय नेते मंडळी पडतात.गोर गरीब व कष्टकरी जनता विविध प्रश्नांनी ग्रासलेली आहे. शाहू,फुले,आंबेडकर विचारांचा वारसा घेऊन दलित महासंघ महाराष्ट्रभर काम करत आहे.युवक जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह घारू युवकांना एकत्रित करून मोठे जन लढा उभा करत आहे.जनतेचे प्रश्न सोडवण्याचे त्यांचे चालू असलेले काम कौतुकास्पद आहे.संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माचे प्रश्न सोडविण्याचे काम केले जाणार आहे असे प्रतिपादन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केले.
नगर-पाथर्डी रोड वरील बाराबाभळी येथे दलित महासंघ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष डॉ.मच्छिंद्र सकटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले,आमदार संग्राम जगताप,युवकचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह घारु,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ सुलाखे,दत्ता तपकिरे,जिल्हाध्यक्ष संजय चांदणे,महिला जिल्हाध्यक्ष अरुणाताई कांबळे,आर.बी.रंधवे,कडुबा लोंढे,अर्चाना सत्रे, प्रवीण कुमार जाधव,नानाभाऊ कांबळे तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवकचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह घारू म्हणले की,दलित महासंघाच्या संपर्क कार्यालयातून समाजाचे विविध प्रलंबित प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्याचे काम करणार आहे.सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभारणार आहे.प्रा.मच्छिंद्र सकटे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे दलित महासंघाचे संघटन वाढून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.