रस्त्याची होणारी दुरावस्था कायमची मिटणार – महापौर रोहिणी शेंडगे

शनी चौक ते महानगरपालिका रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगरगेल्या काही दिवसांपासून शहरात विविध योजनांतर्गत ड्रेनेज, पिण्याचा पाण्याच्या लाईन टाकण्याच्या कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली होती, त्याच पावसाळ्याचे दिवसातही त्यात आणखी भर पडली होती. परंतु आता ही अंडरग्राऊंड कामे आता पुर्णत्वास येत आहेत, त्यामुळे रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन चांगले व दर्जेदार रस्ते करण्यात येत आहेत. त्याचबरोबर काही रस्त्यांचे थ्री लेअरने पॅचिंग करण्यात येत आहे, त्यामुळे खड्डेमुक्त शहर करण्याचा आपला प्रयत्न राहील. शहरातील रस्ते टप्प्याटप्प्याने सिमेंट कॉक्रीटचे करण्यास प्राधान्य देणार आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वारंवार खड्डे पडणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. शनी चौक ते मनपा रस्त्याची होणारी दुरावस्था कायमची मिटणार असून, सिमेंट कॉक्रीटचा हा रोड आता दर्जेदार व चांगला होणार असल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
 शनीचौक ते महानगरपालिका रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, संतोष गेनप्पा, शौकत सर, भिमराज दळवी, इरफान हाजी,कैलास सोनवणे, दिलीप कटारिया, सोपान सुडके, बळवंत सोनवणे, अक्तार गडा, प्रविण बेद्रे, संतोष तनपुरे, गिते, गुंदेचा, चौधरी आदि उपस्थित होते.
    याप्रसंगी सुरेखा कदम म्हणाल्या, शनी चौक ते जुनी मनपा या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असल्याने हा रस्ता चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे होते, यासाठी आपण महापौर असतांना या रस्त्याच्या कामासाठी पुढाकार घेत तसा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता तो मंजुर होऊन या रस्त्याचे काम होत आहे, याचे समाधान वाटते.
    याप्रसंगी शौकत सर म्हणाले, शनी चौक हा रस्ता वर्दळीचा व पावसाळात या वरील भागातील पाणीही या ठिकाणी साचत असल्याने नेहमीच या रस्त्यावर खड्डे पडत, कायम दुरावस्था या रस्त्याची होत असत. याबाबत नगरसेवकांकडे वारवार पाठपुरावा केला जात. आता हा रस्ता सिमेंट कॉक्रीटचा व चांगला होणार असल्याने मोठा प्रश्न सुटणार आहे. सर्वच नगरसेवकांनी परिसरातील विकासासाठी असेच योगदान द्यावे, असे आवाहन केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गेनप्पा यांनी केले तर गणेश कवडे यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!